[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Yash Dayal Instagram Story : आयपीएलमध्ये (IPL 2023) केकेआर (KKR) विरुद्धच्या सामन्यात रिंकू सिंहकडून (Rinku Singh) सलग पाच चेंडूवर पाच षटकार खालेल्ला गुजरातचा गोलंदाज यश दयाल (Yash Dayal) सध्या त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमुळे (Instagram) चर्चेत आला आहे. यश दयाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून लव्हजिहाद बाबत स्टोरी पोस्ट करण्यात आली होती. या स्टोरीवरून आता रणकंदन माजलं आहे. स्टोरीमुळे इस्लामवादी संघटनांनी यश दयालला धारेवर धरलं आहे. मात्र, आता त्याने आपलं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याचं म्हटलं आहे. कुणीतरी अकाऊंट हॅक करुन स्टोरी अपलोड केल्याचं स्पष्टीकरण यशने दिले आहे.
‘मैं जानती हूँ अब्दुल तुम अलग हो’
यश दयालच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून लव्ह जिहादबाबत एक स्टोरी पोस्ट करण्यात आली होती. यामध्ये एक व्यंगचित्र होतं. या व्यंगचित्रात हिंदू मुलींना लव्ह जिहादची शिकार बनवून इस्लामवाद्यांनी मारल्याचे दाखवण्यात आले होतं. दिल्लीतील साक्षी हत्याकांडावर आधारित हे व्यंगचित्र होतं. या कार्टूनमध्ये डोक्यावर टोपी घातलेला तरुण हातात चाकू घेऊन दाखवण्यात आला आहे. हा तरुण तरुणीला म्हणतो, “लव्ह जिहादसारखे काहीही नाही. सर्व काही अपप्रचार आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो.” तर, मुलगी “मला माहित आहे तू वेगळा अब्दुल आहेस, मी तुझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतं” असं म्हणताना व्यंगचित्रात दाखवलं होतं.
यश दयालची ‘लव जिहाद’बाबतची पोस्ट व्हायरल
यश दयालच्या या स्टोरीनंतर इस्लामवाद्यांनी त्याच्यावर निशाणा साधला. यानंतर यश दयालच्या इस्टाग्रामवरून आणखी एक स्टोरी पोस्ट करण्यात आली. या स्टोरीमध्ये लिहिलं होतं की, ”मला माफ करा. स्टोरी चुकून पोस्ट झाली. कृपया द्वेष पसरवू नका. मला सर्व समाज आणि समाजाबद्दल आदर आहे.” पण, याआधीच यश दयालच्या स्टोरीचा स्क्रीनशॉट इंटरनेटवर व्हायरल झाला आणि लोक त्याच्यावर इस्लामविरोधी म्हणत टीका करू लागले. दरम्यान आता यशने आणखी इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करत सांगितलं आहे, की त्याचं अकाऊंट हॅक झालं असून त्याने स्टोरी पोस्ट केलेली नाही.
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, सोमवारी संध्याकाळी यश दयालने निवेदन जारी करत सांगितलं की, “माझ्या इंस्टाग्राम हँडलवरून दोन स्टोरी पोस्ट केल्या गेल्या. या दोन्ही स्टोरी मी पोस्ट केलेल्या नाहीत. मी याबाबत अधिकार्यांना कळवलं आहे. मला वाटतं की माझं इस्टाग्राम हँडल हॅक करून दुसरं कुणीतरी वापरत आहे. मी सर्व धर्मांचा आदर करतो आणि माझ्या इंस्टाग्राम हँडलवरून शेअर फोटोतील विचारसरणीवर माझा विश्वास नाही.”
त्याने पुढे सांगितलं की, ”मला विश्वास आहे की माझे खातं चालवणार्या दुसऱ्या व्यक्तीने ही स्टोरी अपलोड केली आहे. मी माझ्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. मी सर्व समुदायांचा आदर करतो.”
[ad_2]