[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
भिवंडी : भिवंडी (Bhiwandi News) शहरातील 40 ते 45 वर्ष जुन्या यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळली आहे. ढिगाऱ्याखाली दोन अल्पवयीन मुलं अडकली होती. स्थानिकांच्या मदतीनं मुलांना ढिगाऱ्याबाहेर काढण्यात आलं, परंतु त्यापैकी एका मुलाचा मृत्यू झालाय तर दुसरा गंभीर जखमी असून त्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागामध्ये काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून भिवंडी शहरातील दिवानशाह दर्गा रोड येथील कोतवाल शाह दर्गाच्या मागे 40 ते 45 वर्ष जुन्या यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळल्याने दोन अल्पवयीन मुलं या ढिगाऱ्याखाली अडकल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ही बाब लक्षात येताच तत्काळ स्थानिकांच्या मदतीने शोध मोहीम सुरू करण्यात आली कोसळलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्या खालून मुलांना बाहेर काढण्यात स्थानिकांना यश आले परंतु त्यापैकी एका मुलाचा मृत्यू झालाय तर दुसरा गंभीर जखमी असून त्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मोहम्मद हुसेन इरफान अन्सारी ( 10 वर्ष) असे ढिगाऱ्यखाली दबून मयत झालेल्या मुलाचे नाव आहे तर रिजवान अन्सारी (वय 14 वर्ष) असे जखमी मुलाचे नाव आहे
दिवानशाह दर्गा रोड परिसरात कोतवाल शाह दर्गाच्या मागे सुमारे 40 ते 45 वर्ष जुन्या यंत्रमाग कारखाना होता. त्या ठिकाणी कारखाने बंद झाले असून सध्या विकासाच्या माध्यमातून नवीन कन्स्ट्रक्शन करण्याकरता या कारखान्यावर तोडक कारवाई सुरू आहे परंतु या तोडक कारवाई दरम्यान संपूर्ण कारखाना कमकुवत झाला असून कोणत्याही प्रकारची काळजी विकासकांकडून घेण्यात आलेली नाही. या संदर्भात स्थानिकांनी वारंवार तक्रार देखील केली आहे. परंतु जमीन मालक तसेच विकासक यांनी ऐकलं नाही. परिणामी रविवारी सायंकाळी सुमारास कारखान्याची एका बाजूस भिंत अचानक कोसळली. या भिंती शेजारी ही दोन्ही मुलं खेळत असून भिंतीचा संपूर्ण ढिगारा या दोन मुलांच्या अंगावर पडला. स्थानिकांनी तात्काळ ढिगारा बाजूला करण्यास सुरुवात केलं यामध्ये ही दोन्ही मुलं बाहेर काढण्यात आली. परंतु त्यापैकी एका मुलाचा जागे मृत्यू झाला आहे तर दुसऱ्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. सध्या मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनाकरता पाठवण्यात आले आहे. यासंदर्भात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस या संपूर्ण घटनेची चौकशी करीत आहेत.
[ad_2]