[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
निरोगी आयुष्यासाठी बदल
अनुष्का शर्माने दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, ‘मी सूर्यास्ताच्या आधीच रात्रीचे जेवते. साधारणतः संध्याकाळी ५.३० ते ६ च्या दरम्यान माझे जेवण उरकलेले असते आणि याचा माझ्या आरोग्यावर अप्रतिम परिणाम होताना मला दिसतोय.
मी अत्यंत काटेकोरपणे आराम करते आणि व्यवस्थित झोप घेते आणि त्यामुळेच माझे झोपेचे सर्व त्रास गायब झाले आहेत. यामुळे सकाळी मी लवकर उठून अधिक उर्जेसह तयार असते, मी अधिक निरोगी झाले आहे कारण लवकर जेवल्याचा हा परिणाम आहे’
वेट लॉस टिप्स
अनुष्काने याआधी एका मुलाखतीत सांगितले होते की, ती बाहेरचे खात नाही आणि शूटिंगलादेखील घरचे जेवण घेऊन जाते. याशिवाय वजन कमी करण्यासाठी दिवसातून अनेक वेळा थोडे थोडे खाण्यावर भर द्यावा असंही तिने सांगितलं होतं. फिटनेस फ्रिक राहण्यासाठी जेवणावर नियंत्रण असणे गरजेचे आहे.
ध्यानधारणा
दिवसातून दोन वेळा अनुष्का ध्यानधारणा करण्यावर भर देते. ज्यामुळे ती शांत राहाते आणि नकारात्मक विचाराचा तिच्या मनावर परिणाम होत नाही. मनःशांतीसाठी ध्यानधारणा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे असंही तिने सांगितलं.
योगाचा आधार
याशिवाय आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी नियमित योगाचा आधार घेतल्याचेही अनुष्काने एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. इंटमिटेंट फास्टिंगसह ध्यानधारणा, योगा आणि डान्स या सगळ्याचा अनुष्का आपल्या निरोगी आयुष्यासाठी उपयोग करून घेते. मात्र सूर्यास्ताच्या आधी जेवल्याने अर्थात लवकर जेवल्याचा आपल्याला अधिक फायदा झाल्याचेही ती कबूल करते.
Intermittent Fasting म्हणजे काय?
सध्या इंटरमिटेंट फास्टिंगचा ट्रेंड अधिक दिसून येतोय. मात्र याचा फायदा अधिक होत असल्याचे अनेक सेलिब्रिटींनी सांगितले आहे. अत्यंत नॉर्मल डाएट असून दिवसभरात ५०० पेक्षा कमी कॅलरी पोटात जायला हवी.
संध्याकाळी ७ च्या आधी तुम्ही तुमचं जेवण जे हेल्दी आणि घरचे असेल ते खावे आणि त्यानंतर किमान १२ तासांपासून ते १६ तासांपर्यंत पोटात काहीही जाता कामा नये असा हा ट्रेंड असून यामुळे झटपट वजन कमी होण्यास आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
[ad_2]