Internet In Flight Vistara Airlines Will Offer Free Internet In Flight

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Free WiFI in Flights: जेव्हा तुम्ही विमानाने प्रवास करता तेव्हा तुम्ही काही तासांसाठी जगापासून दूर असता. यावेळी प्रवासात मोबाईल फ्लाइट मोडमध्ये टाकावा लागतो. त्यामुळं विमानात इंटरनेट सेवा बंद असते. पण आता विमानात देखील तुम्हाला मोफत इंटरनेट सेवा मिळणार आहे. टाटा समूहाची विमान वाहतूक कंपनी विस्ताराने (vistara airlines) विमान प्रवासादरम्यान प्रवाशांसाठी मोफत वायफाय सेवा (Free WiFI in Flights) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह विस्तारा एअरलाइन्स विमानात इंटरनेट सेवा देणारी पहिली भारतीय कंपनी ठरणार आहे.

दिल्ली आणि लंडन दरम्यान सेवा उपलब्ध 

टाटा सन्स आणि SIA च्या मालकीच्या विस्तारा एअरलाइन्सने अलीकडेच बोईंग 787-9 ड्रीमलायनर विमानात मोफत इंटरनेट सेवा देण्याची घोषणा केली होती. ही सुविधा सध्या दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (IGI) आणि लंडनच्या हिथ्रो विमानतळादरम्यान उपलब्ध आहे. आता कंपनी ही सेवा Airbus 321 Neo मध्ये देखील वाढवणार आहे. सर्व प्रवासी फ्लाइट दरम्यान मर्यादित काळासाठी या सेवेचा लाभ घेऊ शकतील.

विस्तारा ठरली पहिली भारतीय कंपनी

Vistara ही WiFi मेसेजिंग लाँच करणारी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. विमान प्रवासादरम्यान प्रवाशांना त्यांचे स्मार्टफोन, टॅब्लेट आणि लॅपटॉप वापरता येणार आहेत. आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या त्यांच्या प्रवाशांना या सेवेचा लाभ दीर्घकाळापासून देत आहेत. लांब पल्ल्याच्या उड्डाणांमध्ये ही सुविधा सुरु करण्यात आली होती. आता विस्तारा देखील या खास क्लबचा एक भाग होणार आहे.

सोशल मीडियाचा करता येणार वापर 

सुमारे 35 हजार फूट उंचीवर उड्डाण करतानाही प्रवाशांना इंटरनेटद्वारे त्यांचे काम सहज करता येणार आहे. फ्लाइट दरम्यान तुम्ही ईमेल, सोशल मीडिया, मेसेज यासह अनेक सेवा वापरण्यास सक्षम असाल. विस्तारा या सेवेबाबत लोकांच्या प्रतिक्रियाही घेईल आणि गरजेनुसार बदल करेल.

नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी खूप फायदेशीर

जेव्हा तुम्ही विमान प्रवासात असता, त्यावेळी तुम्हाला जगात नेमकं काय चाललं याची कल्पना नसते. त्यामुळं जगातील अनेक विमान कंपन्यांनी मर्यादित इंटरनेट सेवा सुरु केली होती. ही सेवा कर्मचारी आणि व्यावसायिकांसाठी अतिशय फायदेशीर ठरली आहे. आता विस्तारा एअरलाइन्सने प्रवाशांना मोफत इंटरनेट सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

पुणे-दिल्ली विमानात भलताच प्रकार, आधी छातीत कळ आल्याची तक्रार, नंतर म्हणाला, माझ्या बॅगेत बॉम्ब, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग!

[ad_2]

Related posts