Afghanistan Are Out Of The 2023 World Cup Defeated Teams Like England Pakistan Sri Lanka

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Afghanistan Cricket Team : वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक अविस्मरणीय कामगिरी केलेल्या अफगाणिस्तान टीमचा प्रवास अखेर थांबला आहे. आज शेवटच्या साखळी सामन्यातही दक्षिण आफ्रिकेला अफगाणिस्तानने चिवट झुंज दिली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तानचा संघ 50 षटकांत सर्वबाद 244 धावांवर आटोपला. अजमतुल्ला ओमरझाईने नाबाद 97 धावा केल्या. ओमरझाई वगळता अफगाणिस्तानचे इतर सर्व फलंदाज अपयशी ठरले. दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान हे संघ 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकमध्ये शेवटचे साखळी सामने खेळत आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून गेराल्ड कोएत्झीने 4 बळी घेतले.

अफगाणिस्तान या वर्ल्डकपमध्ये तीन वर्ल्डकप जिंकलेल्या पाकिस्तान, श्रीलंका आणि गतविजेत्या इंग्लंडला नमवण्याची कामगिरी केली. यामध्ये सलग तीन सामने जिंकण्याची सुद्धा कामगिरी केली. धावांचा पाठलाग करून त्यांनी दोनवेळा बाजी मारली. यावरून वयाच्या सरासरीमध्ये तरुण टीम असलेल्या अफगाणिस्तानची कामगिरी दिसून येते. प्रशिक्षक अजय जडेजा आणि जोनाथन ट्राॅट यांच्या मार्गदर्शनातील संघाने चमकदार प्रवास केला. अफगाण फिरकी मारा सुद्धा संपूर्ण स्पर्धेत भेदक राहिला. 

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात एकीकडे आफ्रिकन गोलंदाज अफगाणिस्तानच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवताना दिसले, तर दुसरीकडे ओमरझाईने आफ्रिकन गोलंदाजांना वेठीस धरले आणि 107 चेंडूत नाबाद 97 धावा केल्या. उमरझाई पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला जेव्हा संघ सतत विकेट गमावत होता. नंतर संघाच्या विकेट पडत राहिल्या तरी ओमरझाईने बाजूला राहून डावाची धुरा सांभाळली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर अफगाणिस्तानला चांगली सुरुवात झाली. मात्र केशव महाराजने 9व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रहमानउल्ला गुरबाजला बाद करून दक्षिण आफ्रिकेला पहिले यश मिळवून दिले. गुरबाज 22 चेंडूंत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 25 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. बाद होण्यापूर्वी गुरबाज आणि जद्रान यांनी पहिल्या विकेटसाठी 41 (49 चेंडू) धावांची भागीदारी केली.

10व्या षटकात इब्राहिम झद्रान 15 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आणि 11व्या षटकात कर्णधार हशमतुल्ला शाहिदी 02 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, यानंतर रहमत शाह आणि अजमतुल्ला उर्माझाई यांनी काही काळ डाव रोखून धरत चौथ्या विकेटसाठी 49 धावांची (78 चेंडू) भागीदारी केली, जी 24व्या षटकात लुंगी एनगिडीने वैयक्तिक धावसंख्येवर रहमतला बाद करून मोडून काढली. 

यानंतर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला इकराम अलीखिल 27व्या षटकात 12 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आणि 28व्या षटकात मोहम्मद नबी 2 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर राशिद खान आणि ओमरझाई यांनी सातव्या विकेटसाठी 44 (61) धावांची भागीदारी केली, ज्याचा शेवट 38 व्या षटकात रशीद खानच्या (14) विकेटसह झाला. दुसऱ्या टोकाला बराच वेळ उभ्या असलेल्या उमरझाईने नूर अहमदसोबत आठव्या विकेटसाठी 44 धावांची (49 चेंडू) भागीदारी केली, जी 46व्या षटकात नूर अहमदच्या विकेटने मोडली. 26 धावा करून नूर कोएत्झीचा बळी ठरला.

यानंतर 48 व्या षटकात 08 धावा काढून मुजीब उर रहमान कोएत्झीचा बळी ठरला आणि शेवटी नवीन उल हक 02 धावा करून धावबाद झाला. नवीनमुळे अफगाणिस्तानने शेवटची विकेट गमावली. यादरम्यान उमरझाई 97 धावांवर नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला.

इतर महत्वाच्या बातम्या 



[ad_2]

Related posts