India Squad Highlights Against South Africa Virat Rohit Shubman Gill Ruturaj Gaikwad Sanju Samson

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

India Squad Highlights Against South Africa : येत्या 10 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची आज (30 नोव्हेंबर) संध्याकाळी उशिरा घोषणा करण्यात आली. ज्यामध्ये तीन T20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांसाठी संघ निवडण्यात आले. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी वनडे आणि टी-20 मधून विश्रांतीची मागणी केली होती, त्यामुळे दोघांनाही वनडे आणि टी-20 मध्ये विश्रांती देण्यात आली आहे. दोघेही कसोटी मालिकेत संघात सामील होतील. दरम्यान, टीम इंडियाची निवड करताना भविष्याचा विचार आणि सूचक इशारा तसेच शेवटची संधी असा मिलाप झाल्याचे दिसून येते. 

तीन संघांसाठी तीन कॅप्टन 

निवड समितीने संघ निवडताना तिन्ही टी-20, वनडे आणि कसोटीसाठी तीन स्वतंत्र कर्णधार दिले आहेत. केएल राहुलकडे एकदिवसीय आणि सूर्यकुमार यादवकडे टी-20 चे कर्णधारपद मिळाले आहे, तर कसोटीत हिटमॅन रोहित शर्मा कॅप्टन असेल. दुसरीकडे, मराठमोळा ऋतुराज गायकवाड तिन्ही संघात संधी मिळाली आहे. मात्र, ज्या शुभमन गिलला भविष्यातील  कॅप्टन म्हणून पाहिलं जात आहे त्याला वनडे संघासाठी निवडण्यात आलेलं नाही. वर्ल्डकपमध्ये गिलची कामगिरी सुमार झाली होती. त्याच्या जागी साई सुदर्शनला संधी मिळाली आहे.

सॅमसन, चहल मोठी संधी, बुमराह कसोटी संघाचा उपकर्णधार 

दुसरीकडे, दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकलेल्या संजू सॅमसन आणि युझवेंद्र चहल यांचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे. रजत पाटीदार, साई सुदर्शन या नव्या चेहऱ्यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. युझवेंद्र चहल आणि संजू सॅमसन यांना ही मोठी संधी मिळाली आहे. केएस भरतला कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. आता कसोटी संघात केएल राहुल आणि इशान किशन हे यष्टीरक्षक आहेत. जसप्रीत बुमराह आता कसोटी संघाचा उपकर्णधार असेल.

सूर्यकुमारला वनडेतून, तर रहाणे-पुजाराला कसोटी संघातून वगळलं

सूर्यकुमार यादव सातत्याने क्रिकेट खेळत असल्याने त्याला भारतीय वनडे संघातून विश्रांती देण्यात आली आहे. श्रेयस अय्यरचे भारतीय कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला स्थान मिळालेले नाही तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांचा समावेश करण्यात आला आहे. कुलदीप यादवची भारतीय टी-20 संघात निवड झाली आहे. 

टी-20 च्या कर्णधारपदासाठी सूर्यकुमार यादववर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. उपकर्णधार रवींद्र जडेजा असेल. म्हणजेच रवींद्र जडेजावर पहिल्यांदाच मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे ऋतुराज गायकवाडचा तिन्ही फॉरमॅटमध्ये समावेश करण्यात आला आहे.

मोहम्मद शमी दुखापतग्रस्त 

मोहम्मद शमीवर सध्या वैद्यकीय उपचार सुरू असून त्याची उपलब्धता फिटनेसवर अवलंबून आहे. या दौऱ्याची सुरुवात टी-20 मालिकेने होणार आहे. यानंतर 17 डिसेंबरपासून वनडे मालिका सुरू होईल. 26 डिसेंबरपासून सेंच्युरियनमध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. यानंतर, दुसरी कसोटी नवीन वर्षात म्हणजे 2024 मध्ये 3 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळली जाईल.

इतर महत्वाच्या बातम्या 



[ad_2]

Related posts