उद्धव ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवी यांचा जामीन मंजूर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उपनेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना जामीन मिळाला आहे. दत्ता दळवी यांना मुलुंड न्यायालयातून जामीन मिळाला असून, १५ हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली आहे. 

आरोपी हे ज्येष्ठ नागरिक असून त्यांनाा काही आजार आहेत आणि ते पळून जाण्याची भीती नसल्याने जामीन मंजूर करण्यात आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका सभेत शिवीगाळ केल्याप्रकरणी दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात जाहीरपणे अवमानकारक वक्तव्य केल्याच्या प्रकरणात दत्ता दळवी यांचा समावेश होता. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. दत्ता दळवी हे शिवसेनेच्या कट्टर शिवसैनिकांपैकी एक आहेत.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर दळवी यांनी ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केला होता. दत्ता दळवी हे मुख्यमंत्र्यांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्यामुळे चर्चेत आले होते. दत्ता दळवी यांच्या भाषेवर आक्षेप घेत भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

या प्रकरणी पोलिसांनी भादंविच्या कलम १५३ (ए), १५३ (बी), १५३ (ए) (१) सी, २९४, ५०४, ५०५ (१) (सी) अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीही सुनावली होती.

मात्र आज जामीन घेतानाही जामीन घेण्यास विलंब सूडाच्या भावनेतून होत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून सातत्याने केला जात होता. आज अखेर त्यांची जामिनावर सुटका झाली आहे.

‘या’ अटी आणि शर्तींवर दत्ता दळवी यांना जामीन

  • प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत काही निर्बंध कायम आहेत

  • मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कोणतेही अवमानकारक वक्तव्य करण्यास बंदी


  • कोणत्याही प्रकारचे प्रक्षोभक विधान करण्यास बंदी


  • पोलिसांना सहकार्य करणे बंधनकारक आहे


  • कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा

7 डिसेंबरपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन


मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही तर… : छगन भुजबळ

[ad_2]

Related posts