Deepfake Videos And Photos How To Protect Yourself From Deepfake Videos Take This Care Before Sharing Photo And Video On Social Media Abpp

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Deepfake Videos And Photos:  अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत, असं आपण म्हणतो, पण सध्या सोशल मीडिया (Social Media) ही देखील माणसाची मुलभूत गरज झालीये, असं म्हणता येईल. तासंतास सोशल मीडिया अॅक्टिव असणारे बरेच लोक आपण आजूबाजूला पाहतो. पण सोशल मीडियाचे जेवढे फायदे आहेत, तेवढे तोटे देखील आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून तुम्ही डीपफेक व्हिडीओ आणि फोटो याबद्दल ऐकत असाल. काही सेलिब्रिटींचे डीपफेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.  अभिनेत्री  रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna), आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) या सेलिब्रिटींचे डीपफेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. पण सेलिब्रिटींप्रमाणेच सर्वसामन्य व्यक्तींचे देखील डीपफेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होऊ शकतात का? तसेच हे डीपफेक व्हिडीओ कसे तयार केले जातात? असे प्रश्न अनेकांना पडले असतील. सायबर तज्ज्ञ तन्मय दीक्षित यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये डीपफेक व्हिडीओ आणि फोटो (Deepfake Videos And Photos) याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. 

सायबर संस्कार या संस्थेचे तन्मय दीक्षित यांनी सांगितले की, डीपफेक ही एक अशी टेक्नॉलॉजी आहे, ज्याच्यामध्ये आपण जो सोर्स फोटो अपलोड करतो, त्याचा वापर दुसऱ्या फोटो किंवा व्हिडीओमध्ये  करुन डीपफेक व्हिडीओ किंवा फोटो तयार केला जातो. मुलांचे किंवा मुलींचे मल्टिपल फोटो वेगवेगळ्या अँगलने सोशल मीडियावर अपलोड केले असतील तर टेक्नॉलॉजीचा वापर करुन त्याचा डीपफेक व्हिडीओ किंवा फोटो तयार केला जाऊ शकतो.

सर्वसामान्यांवर देखील डीपफेकची टांगती तलवार 

सर्वसामन्य व्यक्तींचे जर सर्व अँगलचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असतील, तर त्याचा देखील टेक्नॉलॉजीचा वापर करुन डीपफेक फोटो किंवा व्हिडीओ तयार केला जाऊ शकतो. पॉलिटिक डीपफेक व्हिडीओ तयार केले जातात तसेच पॉर्नोग्राफीमध्ये देखील याचा वापर केला जातो.

सोशल मीडियावर फोटो पोस्ट करण्याआधी घ्या ‘ही’ काळजी (How to Protect Yourself From Deepfake Videos)

जेव्हा कोणताही फोटो किंवा व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर अपलोड करता तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, आपण फोटोसोबत जी माहिती अपलोड करत आहोत, त्यामध्ये मेटा-डेटा हा एक महत्वाचा भाग असतो. त्यामध्ये लोकेशन आणि इतर माहिती देखील असते. त्यामुळे ही माहिती तुम्हाला हाइड करावी लागेल कारण ही माहिती डिटेक केली जाते.

आपला चेहरा हा फोटोमध्ये आयडेंटिफाय होतो. त्यामुळे आपला डोळा किंवा चेहरा थोडा ब्लर करुन फोटो अपलोड  करावा. आपल्याला ही पण गोष्ट लक्ष ठेवावी लागेल की, सोशल मीडियावर फोटो अपलोड करताना आपला वॉटर मार्क असलेला फोटोचं अपलोड करावा, ज्यामुळे डीपफेक व्हिडीओ तयार करण्यात आला तर आपल्या प्रोफाइलवरुन खरा शेअर करण्यात आला होता, हे लक्षात येते.

डीफफेक व्हिडीओ किंवा फोटो तयार करण्यासाठी कोणत्या अॅप्सचा केला जातो वापर? (Deepfake Apps) 

डीफफेक व्हिडीओ आणि फोटोचे बरेच अॅप्स सध्या उपलब्ध आहे. प्लेस्टोअरवर देखील अनेक अॅप्स आहेत. फेस स्वॅपलाईव्ह, डीपस्वॅप, फेसअॅप, फेसमॅजिक, डीपफेक स्टूडियो अशी या अॅप्लिकेशन्सची नावं आहेत. 

डीफफेक व्हिडीओ किंवा फोटोवर कशी घ्याल अॅक्शन? (Laws Regulating Deepfakes in India)

डीपफेक व्हिडीओ किंवा फोटोचे जे Victim झालेले आहेत, त्यांनी सर्वप्रथम त्यांचा जो फोटो किंवा व्हिडीओ लीक झाला आहे त्याच्या संबंधित पुरावे स्वत:कडे ठेवावा. कारण त्या पुराव्याचा वापर करुनच तो व्हिडीओ किंवा फोटो लीक करण्याऱ्यापर्यंत पोहोचता येणार आहे. तुम्ही जर भारतात राहात असाल तर सायबर सेलच्या cyber crime gov.in या साइटवर तक्रार नोंदवू शकता किंवा तुम्ही जवळच्या पोलीस स्टेनशमध्ये जाऊन तक्रार करु शकता.  तसेच ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन तुमचा डीपफेक फोटो किंवा व्हिडीओ लीक झाला असेल (उदा. इन्स्टाग्राम किंवा युट्यूब) त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील तुम्ही तक्रार करु शकता. ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तुमची तक्रार व्हेरिफाय करेल.  त्या प्लॅटफॉर्मच्या कम्युनिटी गाइडलाइन्सनुसार, ज्या suspicious अकाऊंटवरुन तुमचा व्हिडीओ किंवा फोटो व्हायरल केलेला आहे त्याला बॅन केलं जातं, डिलिट केलं जातं किंवा त्या प्लॅटफॉर्मच्या कम्युनिटी गाइडलाइन्सनुसार त्याच्यावर अॅक्शन्स घेतली जाते.

सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल (Celebs Who Fell Victim To Deepfake Videos And Photos)

अभिनेत्री रश्मिका मंदाना, आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांसारख्या अभिनेत्रींचे डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. विविध प्लॅटफॉर्मवर हे व्हिडीओ शेअर करण्यात आले. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर या अभिनेत्रींना पाठिंबा देऊन या प्रकरणावर संताप व्यक्त केला. अमिताभ बच्चन यांनी रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा व्हिडीओ क्रिएट करणाऱ्यावर कायदेशीर करवाई करण्याची मागणी केली होती. तसेच चिन्मयी श्रीपाद, नागा चैतन्य आणि  मृणाल ठाकूर  यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन रश्मिकाच्या डीपफेक व्हिडीओ प्रकरणाबाबत संताप व्यक्त केला होता.  

इतर महत्वाची बातमी-

What Is ClearFake : Deepfake नंतर आता ClearFake चा धोका; नेमकं काय आहे ClearFake?

[ad_2]

Related posts