Oneplus 12 Series Launching Today In China Check Specs Details And Know More About Phone

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Oneplus 12 series : चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी वनप्लस आज चीनमध्ये Oneplus 12 सीरिज (Oneplus 12 series) लाँच करणार आहे. आज कंपनीला दहा वर्ष पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने कंपनी Oneplus 12 आणि Oneplus 12R लाँच करणार आहे. आतापर्यंत Oneplus 12 बद्दलच्या अनेक बातम्या तुम्ही आमच्या माध्यमातून वाचल्या असतील, आज आम्ही तुम्हाला वनप्लस 12 आर बद्दल अपडेट्स देणार आहोत. हा स्मार्टफोन वनप्लस 12 पेक्षा स्वस्त असेल आणि भारतात वनप्लस 11 आर नंतरचं मॉडेल म्हणून लाँच केला जाईल. कंपनी हा फोन जागतिक स्तरावर लाँच करण्याच्या तयारीत असून ग्लोबल वेबसाईट सर्टिफिकेशनवर ही माहिती समोर आली आहे. जाणून घ्या या फोनचे फिचर्स…

Oneplus 12R मध्ये काय असेल खास?

माहितीनुसार, कंपनी या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 SOC सपोर्ट करू शकते. Gizmochina रिपोर्टनुसार, स्मार्टफोनमध्ये 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट सह 6.7 इंचाचा 1.5 के OLED डिस्प्ले आहे. 100 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,500 एमएएच बॅटरी मिळू शकते. वनप्लस 11 आर च्या तुलनेत हे एक मोठे अपडेट आहे कारण जुन्या फोनमध्ये कंपनीने 5,000 एमएएच बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेट सपोर्ट केला होता. फोटोग्राफीबद्दल या फोनमध्ये भन्नाट फिचर्स देण्यात आले आहेत.  फोनमध्ये OIS आणि EIS सपोर्टसह दोन 50 MP कॅमेऱ्यांसह ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल आणि दुसरा EIS सपोर्टसह 8 MP कॅमेरा मिळेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी वनप्लस 12 मध्ये 16 MP चा कॅमेरा मिळू शकतो.

भारतात कधी लाँच होणार?

कंपनीने आपल्या फ्लॅगशिप फोनच्या भारतात लाँचिंगबाबत  अजून कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. हे दोन्ही फोन नवीन वर्षात लाँच केले जाऊ शकतात. माय स्मार्ट प्राइसच्या रिपोर्टनुसार, वनप्लस 12 आणि 12 आर जानेवारीमध्ये लाँच केले जाऊ शकतात.

कॅमेरा स्पेसिफिकेशन्स…

वनप्लस 12 मध्ये कंपनी शानदार कॅमेरा सेटअप देणार आहे. यात तुम्हाला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल ज्यात 50 MP सोनी Sony LYT-808प्रायमरी कॅमेरा लेन्स, 48 MP सोनी  Sony IMX581 अल्ट्रा वाइड कॅमेरा लेन्स आणि 64 MP Omnivision O64B पेरिस्कोप लेन्स असू शकते. माहितीनुसार फोनमध्ये तुम्हाला क्वालकॉमचा लेटेस्ट चिपसेट स्नॅपड्रॅगन 8 वा Gen 3 SOC प्रोसेसरचा सपोर्ट मिळू शकतो. नवीन चिपसेट मध्ये अनेक AI फीचर्स देण्यात आले आहेत.

इतर महत्वाची बातमी-

iPhone 15 Offers : काय सांगता ? iPhone 15 आता फक्त 40 हजारात मिळणार; काय आहेत ऑफर्स?

[ad_2]

Related posts