[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Wrestlers Protest: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्या अटकेची मागणी करत गेल्या अनेक दिवसांपासून कुस्तीपटूंनी आंदोलन (Wrestlers Protest) छेडलं आहे. गेल्या दीड महिन्यांपासून कुस्तीपटू सरकारकडे बृजभूषण शरण सिंह यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईची मागणी सातत्यानं करत आहेत. यावर मात्र भाजप (BJP) सरकार मूग गिळून गप्प बसल्याची आणि बृजभूषण यांना पाठीशी घालत असल्याचे आरोप सातत्यानं होत आहेत. अशातच आता याप्रकरणी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी मौन सोडलं आहे. सरकारचीही आंदोलक कुस्तीपटूंना न्याय मिळावा अशीच इच्छा आहे, असं ते म्हणाले.
भाजप सरकारचा उल्लेख करत अनुराग ठाकूर कुस्तीपटूंच्या आरोपांबाबत बोलताना म्हणाले की, “आम्ही खेळ आणि खेळाडूंना पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि करत राहू.”
सरकार कोणाला वाचवत नाहीये : अनुराग ठाकूर
केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी कुस्तीपटूंसोबतच्या बैठकीचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषण केल्याबाबातच्या 7 वर्षांपूर्वीच्या तक्रारीबाबत सांगितलं. तसेच, यावेळी कुस्टीपटूंकडून वारंवार केल्या जाणाऱ्या बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसंदर्भातही अनुराग ठाकूर यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, “आम्ही (भाजप सरकार) कोणाचाच बचाव करत नाही आणि ना कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. भारत सरकारचीही याप्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी अशीच इच्छा आहे आणि यावर आम्ही ठाम आहोत.”
समितीचा निष्पक्ष तपास
अनुराग ठाकूर यांनी सांगितलं की, त्यांनी आपले सर्व दौरे सोडले आणि कुस्तीपटूंशी संवाद साधला. सलग दोन दिवस चर्चा सुरू राहिल्या. यादरम्यान, खेळाडूंनी त्यांना 7 वर्ष जुन्या तक्रारीवर कारवाई करण्याचे आवाहन केलं. कुस्तीपटूंशी बोलूनच आम्ही समिती स्थापन केल्याचं ठाकूर म्हणाले. समितीनं या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली आहे.
Reels
दरम्यान, देशासाठी अनेक पदकं जिंकणाऱ्या महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळासह अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला. मात्र, आता कुस्तीपटू बृजभूषण सिंह यांच्या अटकेच्या मागणीवर ठाम आहेत. अलीकडेच कुस्तीपटूंनी आपली पदकं गंगेत विसर्जित करणार असल्याची घोषणाही केली होती. मात्र त्यानंतर शेतकरी नेत्यांनी समजूत काढल्यानंतर कुस्तीपटूंनी पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय मागे घेतला.
[ad_2]