( प्रगत भारत । pragatbharat.com)
Viral News : वाहनांचे हॉर्न, टीव्हीचा मोठा आवाज यासारख्या गोष्टी रोजच्या रोज आपल्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम करत आहेत. आता यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असलेले इअरफोन (earphones) आणि हेडफोन्सचीही भर पडली आहे. या उपकरणांमुळे ऐकण्याची क्षमता कमी होत असल्याचे अनेक प्रकरणांमधून समोर आले आहे. त्यामुळे इअरफोन हे धोक्याची घंटा ठरत आहेत. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरमध्ये घडलाय. इअरफोनच्या अतिरिक्त वापरामुळे एक तरुण ऐकण्याची क्षमताच (Deafness) गमावून बसला होता.
आजच्या काळात तरुणांमध्ये वायरलेस इअरफोन आणि इअरबड्सचा वापर खूप वाढला आहे. बर्याच वेळा तरुणाई प्रमाणापेक्षा जास्त वेळ इयरफोन वापरत असल्यामुळे त्यांची ऐकण्याची क्षमता गमावत आहेत. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील एका 18 वर्षांच्या मुलाची बराच वेळ इयरबड्स वापरल्याने श्रवणशक्ती कमी झाली आहे. मात्र, शस्त्रक्रियेनंतर मुलाची श्रवणशक्ती पूर्वीप्रमाणे झाल्याने कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, इयरफोनचा जास्त वापर केल्यामुळे या मुलाची ऐकण्याची क्षमता कमी झाली होती. शस्त्रक्रियेमुळे मुलगा आता ऐकू येऊ लागले आहे. जेव्हा लोक बऱ्याच वेळासाठी इयरबड्स वापरता, तेव्हा कानाच्या आतील आर्द्रता वाढते, ज्यामुळे बॅक्टेरिया आणि विषाणूंना वाढण्यासाठी वातावरण मिळते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, आपल्या शरीराप्रमाणेच कानातही हवा खेळती राहणे आवश्यक आहे. ते जास्त काळ बंद ठेवल्याने घाम जमा होतो आणि त्यानंतर संसर्ग होतो.
आपल्या शरीराप्रमाणेच कानातही वेंटिलेशनची गरज असते. जेव्हा लोक बराच काळ इअरबड्स वापरतात तेव्हा कानामध्ये आर्द्रता वाढते. कान बराच वेळ झाकून ठेवल्याने घाम येतो आणि त्यानंतर संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही इअरबड्स वापरत असाल तर तुम्ही सावध राहायला हवे.
जवळजवळ सर्व तरुण रुग्णांमध्ये, कमी ऐकू येण्याचे प्रमुख कारण म्हणजे सतत इअरफोन किंवा हेडफोन लावून मोठ्या आवाजात गाणी किंवा व्हिडिओ पाहणे आणि ऐकणे हेच आहे. कानात शिट्टीसारखा आवाज येत असल्याने अनेक रुग्ण त्रस्त होतात. तसेच मोठ्या आवाजामुळे कानाच्या पेशींचे नुकसान होते. यासोबत, संसर्गाचा धोका वाढतो. वाहनांचा कर्कश आवाज आणि हॉर्नमुळे आधीच समस्या वाढत होत्या, आता इअरफोन्समुळे त्यात वाढ होऊ लागली आहे.
कान सुरक्षित कसे ठेवायचे?
तुमचे कान सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही इअरबड्सचा मर्यादित वेळेत वापर करण्याचा प्रयत्न करा.
तुमच्या डिव्हाइसची कमाल आवाज पातळी 60 टक्क्यांपेक्षा जास्त सेट करू नका.
नॉइज कॅन्सलेशनसह इअरबड वापरा कारण ते बाहेरचा आवाज रोखू शकतात, ज्यामुळे तुम्हाला कमी आवाजात ऐकता येईल.
घाण किंवा घाम तयार होण्यापासून रोखण्यासाठी आपले कान नियमितपणे स्वच्छ करा. शक्य असल्यास, इअरबड्सऐवजी ओव्हर-इअर हेडफोन वापरा.