इअरबड्सच्या वापरामुळे ऐकूच येईना; 18 वर्षाच्या तरुणासोबत धक्कादायक प्रकार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : वाहनांचे हॉर्न, टीव्हीचा मोठा आवाज यासारख्या गोष्टी रोजच्या रोज आपल्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम करत आहेत. आता यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असलेले इअरफोन (earphones) आणि हेडफोन्सचीही भर पडली आहे. या उपकरणांमुळे ऐकण्याची क्षमता कमी होत असल्याचे अनेक प्रकरणांमधून समोर आले आहे. त्यामुळे इअरफोन हे धोक्याची घंटा ठरत आहेत. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरमध्ये घडलाय. इअरफोनच्या अतिरिक्त वापरामुळे एक तरुण ऐकण्याची क्षमताच (Deafness) गमावून बसला होता. आजच्या काळात तरुणांमध्ये वायरलेस इअरफोन आणि इअरबड्सचा वापर खूप वाढला आहे. बर्‍याच वेळा तरुणाई प्रमाणापेक्षा जास्त वेळ…

Read More