Punam Raut Team India Womens Team Unhappy With Selection Committee For Not Select In Womens Cricket Team Even Doing Good Performance Abpp

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Team India Punam Raut :  भारतीय महिला क्रिकेट संघात (Indian Women’s Cricket Team) सध्या बदल होत असल्याचे चित्र आहे. मात्र, त्याचवेळेस अनुभवी खेळांडूना डावलले जात असल्याची चर्चा सुरू होती. अशातच टीम इंडियाची क्रिकेटपटू पूनम राऊतने (Punam Raut) निवड समितीवर थेट आरोप केला आहे. महिला क्रिकेट संघाच्या निवड समितीला फक्त त्यांच्या निकटवर्तीय खेळाडूंना टीम इंडियात संधी द्यायची असून वयाचे कारण देत अनुभवी खेळाडूंना डावलले जात असल्याचा गंभीर आरोप  टीम इंडियाची महिला क्रिकेटपटू पूनम राऊत केला आहे. सध्या क्रिकेट संघात असलेल्या नवीन खेळाडूंपेक्षा आपण चांगली कामगिरी करू शकतो, असा विश्वासही तिने व्यक्त केला आहे.  

पाठिशी कोणीच नसल्याची खंत

एबीपी माझासोबत बोलताना पूनम राऊतने म्हटले की, मला कुठलाही पाठिंबा नाही. मी मुंबईमध्ये क्रिकेट खेळले असते तर मला मुंबई क्रिकेट असोसिएशनने नक्कीच पाठिंबा दिला असता. मात्र, हा पाठिंबा त्यांनी माझ्या कामगिरीच्या आधारावर दिला असता. चांगली कामगिरीकरूनही आपल्या पाठिशी कोणीच उभं राहत नसल्याचे पूनमने म्हटले. वयाची मर्यादा जर असेल तर वयाच्या तिशीनंतर आम्ही क्रिकेट खेळण्याचं बंदच करायचं का असा सवालही तिने केला आहे. क्रिकेट या खेळामध्ये वयाची मर्यादा ठेवत नाहीत. मिताली राज वयाच्या चाळीशीपर्यंत खेळली. बाकीचे सीनियर खेळाडूदेखील एवढ्या वयापर्यंत खेळू शकतात. तर माझे वय त्यांच्याएवढे नसतानाही मला का खेळायला संधी दिली जात नाही असा प्रश्नही तिने निवड समितीला केला. 

चांगली कामगिरी तरीही….

कसोटी क्रिकेट संघात नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली. मला कितीतरी वर्ष झाले टी-20 संघामध्ये संधीच दिली नाही. मी सध्या क्रिकेट खेळत असतानाही माझ्या निवडीचा विचारही निवड समिती करत नसल्याचे पूनमने म्हटले. टीममध्ये शुभा सतीश, हरलीन देओल आदी नवीन खेळाडूंना संधी दिली गेली आहे. मात्र, त्यांनी केलेल्या धावा या माझ्यापेक्षा कमी आहेत. त्याशिवाय या खेळाडूंना कसोटी संघातही स्थान दिले गेले असल्याचे पूनमने म्हटले. 

निवड समितीवर आरोप…

निवड समिती सदस्यांचे आपल्या राज्यातील खेळाडूंना प्राधान्य देत असल्याचे पूनमने म्हटले. या सगळ्यात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवरही परिणाम होत असल्याचेही पूनमने म्हटले. वयाच्या 28 ते 35 या वयामध्येच खेळाडू हा ताकदवान आणि त्याचा खेळ मजबूत झालेला असतो. नेमकं याच काळामध्ये निवड समिती खेळाडूंना वयाचे कारण सांगून डावलत आहे त्यामुळे निवड समितीने चांगला खेळांचा विचार करणे गरजेचे असल्याचे तिने म्हटले. 2021 मध्ये जेव्हा माझी चांगली कामगिरी सुरू असताना मला निवड समितीने बाहेर काढले.  माझ्या पाठीमागे खंबीरपणे कोणी नाही. त्यामुळे माझ्या बाजूने कोणी आवाज उठवू शकत नाही अशी खंत पूनम राऊतने व्यक्त केली. 

क्रिकेट असोसिएशनबद्दल माझी काही तक्रार नाही. याउलट मला त्यांनी खेळण्यासाठी संधी दिली. मात्र निवड समिती जाणीवपूर्वक मला डावलत असल्याचे पूनमने म्हटले. जवळपास सहा खेळाडूंना वयाच्या कारणावरून संघातून बाहेर काढण्यात आले आहे.

पूनमची आकडेवारी सरस, तरीही का डावलले जातंय? प्रशिक्षक संजय गायतोंडेंचा सवाल 

पूनम राऊतला सातत्याने डावलले जात असल्यावर प्रशिक्षक संजय गायतोंडे यांनीदेखील नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, सध्या महिला क्रिकेट संघात पूनम ही चांगला फिटनेस असणारी खेळाडू आहे. तिची सरासरीदेखील चांगली आहे. कसोटी सामन्यात तिचे स्मृती मंधाना इतक्याच धावा आहे. नव्या खेळाडूंना निवड समिती संधी देत असली तरी त्यांच्या धावा पूनमपेक्षा निम्म्यादेखील होत नाहीत. फक्त तरुण खेळाडूंना संधी देणार आणि अनुभवी, चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना डावलणार असाल तर टीमच्या पराभवाची संधी अधिक असते असेही गायतोंडे यांनी सांगितले. पूनमही ही हलाखीच्या परिस्थितीशी संघर्ष करून इथपर्यंत पोहचली आहे. तिचा खेळ उत्तम असून तिला निवडीच्या सामन्यांनाही का डावलले जातेय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 


अशी आहे पूनमची कामगिरी 

पूनम राऊत ही सलामीची फलंदाज आहे.  महिला कसोटीत तिने चार सामन्यांमध्ये 7 डावात 44 च्या सरासरीने 264 धावा केल्या आहेत. यामध्ये एका शतकाचा समावेश आहे. तर, 73 वन-डे सामन्यात 34.83 च्या सरासरीने 2299 धावा केल्या आहेत. यामध्ये तीन शतके आणि 15 अर्ध शतकांचा समावेश आहे. तर, 35 टी-20 सामन्यांमध्ये 27.65 च्या सरासरीने पूनमने 780 धावा केल्या असून चार अर्धशतके तिने झळकावली आहेत. 

 



[ad_2]

Related posts