After 100 years Neechbhang Mahadhana Rajayoga will be formed Chances of getting wealth for this zodiac sign

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Neechbhang And Mahadhan Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्यांच्या ठरलेल्या वेळी एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतात. यावेळी ग्रहांच्या राशी बदलामुळे शुभ आणि राजयोग तयार करतात. या राजयोगाचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होताना दिसतो. 

अवघ्या काही दिवसांमध्ये नवीन वर्ष सुरु होणार आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला बुध ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. मीन, बुधाच्या संक्रमणामुळे नीचभंग राजयोग आणि महाधन राजयोग तयार होणार आहेत. तब्बल 100 वर्षांनी हे राजयोग तयार होणार असून यावेळी काही राशींचे नशीब चमकू शकणार आहे. जाणून घेऊया या 2 राजयोगांमुळे कोणत्या राशींना सकारात्मक परिणाम मिळणार आहेत.

मिथुन रास (Mithun Zodiac)

महाधन आणि नीचभंग राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यावेळी तुमचे करिअर आणि व्यवसाय चमकेल. या काळात तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा दुप्पट मजबूत असेल. व्यवसायातही तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. प्रमोशन मिळू शकते. जे बेरोजगार आहेत त्यांना नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. अडकलेले किंवा रोखलेले पैसे परत मिळू शकतात. 

वृषभ रास (Taurus Zodiac)

महाधन आणि नीचभंग राजयोग तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतात. कारण बुध ग्रह तुमच्या राशीच्या उत्पन्न आणि लाभ स्थानात गोचर करणार आहे. यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तुमच्या जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होणार आहे. गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही ते करू शकता. जर तुमचं प्रेमप्रकरण सुरु असेल तर त्यामध्ये तुम्हाला त्यात यश मिळू शकते.

कर्क रास (Cancer Zodiac)

महाधन आणि नीचभंग राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी शुभ ठरू शकते. यावेळी तुम्हाला नशीबाची साथ मिळू शकते. काळात तुमचे कौटुंबिक जीवन देखील पूर्वीपेक्षा चांगले होईल. तुमच्या घरात किंवा कुटुंबात काही शुभ किंवा धार्मिक कार्यक्रम होऊ शकतात. बुद्धीच्या मदतीने तुम्ही तुमची सर्व कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून तुम्हाला फायदा होणार आहे. 

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts