[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Gautam Gambhir On Yuvraj Singh : टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आणि सध्या अनेक वादाचे कारण झालेला गौतम गंभीर सध्या चर्चेत आहे. अलीकडेच, लिजेंड्स लीगच्या सामन्यादरम्यान मैदानावर त्याचा श्रीशांतसोबत वाद झाला होता. आता एका पॉडकास्टमध्ये गौतम गंभीरने माजी भारतीय खेळाडू युवराज सिंगचा मुद्दा उपस्थित केला. गंभीर हा स्पष्ट बोलण्यासाठी ओळखला जातो, मात्र, त्याच्या अनेक वक्तव्यांना वादही निर्माण झाले आहेत. आता गंभीर म्हणाला की, 2011 च्या विश्वचषकाचा ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ ठरलेल्या युवराज सिंगबद्दल किती लोक बोलतात, कदाचित त्याच्याकडे चांगली पीआर एजन्सी नाही.
वाचा : S. Sreesanth on Gautam Gambhir : प्रत्येकाला बोलतोस, तुझी लायकी काय? सुप्रीम कोर्टाच्या वर झालास का?? श्रीसंथ गौतम गंभीरवर तुटून पडला!
गंभीर म्हणाला तरी काय?
गंभीर ‘एएनआय पॉडकास्ट विथ स्मिता प्रकाश’ मध्ये बोलला. जिथे त्याला विचारण्यात आले की 2011 च्या विश्वचषक फायनलमध्ये त्याची 97 धावांची खेळी धोनीच्या 91 धावांच्या नाबाद खेळीने झाकली गेली होती? गंभीरने उत्तर दिले, “जेव्हा लोक कमी दर्जाविषयी बोलतात, तेव्हा हेच लोक कमी मूल्यमापन, कमी प्रतिनिधित्व आणि कमी मूल्यांकनाबद्दल बोलतात. काहीही कमी असत नाही.”
Gautam Gambhir in a podcast. pic.twitter.com/6RGpiZPI6T
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 8, 2023
युवराज सिंगला जे श्रेय मिळायला हवे ते मिळत नाही
यानंतर गंभीरला युवराज सिंगबद्दल विचारण्यात आले, “युवराज सिंगला जे श्रेय मिळायला हवे ते मिळत नाही.” याला उत्तर देताना गंभीर म्हणाला, “आणि तुम्हाला हे माहीत आहे. तुम्हीच मला सांगा, 2011 च्या विश्वचषकात टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या खेळाडूबद्दल लोक किती बोलतात? कदाचित त्याच्याकडे चांगली पीआर एजन्सी नसेल.” तो पुढे म्हणाला, “ब्रॉडकास्टर कधीही पीआर मशीन असू शकत नाहीत. ब्रॉडकास्टरसाठी, ड्रेसिंग रूममध्ये बसलेले सर्व खेळाडू समान असले पाहिजेत. गंभीरचा हा बोलण्याचा रोख महेंद्रसिंह धोनीकडे असल्याची चर्चा रंगली आहे.
आत्तापर्यंत धोनी भारतासाठी शेवटचा कर्णधार ठरला ज्याने त्याच्या नेतृत्वाखाली ICC ट्रॉफी जिंकली. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2011 मध्ये वर्ल्डकप आणि 2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.
इतर महत्वाच्या बातम्या
[ad_2]