[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई : शिवसेना (Shiv Sena) आमदार अपात्रता सुनावणीत (MLA Disqualification Case) आज शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांची साक्ष सुरू आहे. सुरूवातीला शेवाळेंना शिंदे गटाचे वकील साखरेंनी सवाल विचारले. त्यानंतर ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत शेवाळेंची उलट तपासणी घेत आहेत. शिवसेना कार्यकारिणी बैठकीवरून शेवाळेंना सवाल विचारले जात आहेत. दरम्यान विधानसभा अध्यक्ष ठाकरे गटाच्या वकिलांमध्ये सुनावणी दरम्यान नाराज झाले. वारंवार तेच तेच प्रश्न विचारून वेळ घालवू नका, ज्या प्रश्नांची उत्तरं मागे देण्यात आली आहेत. तेच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारू नका असं अध्यक्षांनी वकिलांना सांगितलं.
देवदत्त कामत आणि खासदार शेवाळे यांच्यातील प्रश्नोत्तरे :
कामत – आपण आता जी साक्ष दिली त्या संदर्भात तुम्ही 25 नोव्हेंबर 2023 ला जे शपथ पत्र सादर केले त्यात उल्लेख का नाही केला ?
शेवाळे- जे प्रश्न विचारले गेले त्याचे उत्तर मी दिली
कामत – तुम्ही सही करण्यापूर्वी तुमचे प्रतिज्ञा पत्र वाचले आहे का हे 11 नोव्हेंबर 2023 ला सादर केले ?
शेवाळे – हो
कामत – तुम्ही त्या दिवशी कुठे होता ?
शेवाळे- मुंबई
कामत – तुम्ही शपथ पत्रामद्धे मांडल्याप्रमाणे शिवसेना विधिमंडळ पक्षाचे सदस्य आहेत का?
शेवाळे- हो, मी शिवसेना पक्षाचा लोकसभेत निवडून आलेला खासदार आहे
कामत – शिवसेना विधिमंडळ पक्षाला संसदेत शिवसेना पारलीमेंट्री पक्ष म्हणतात का ?
शेवाळे – हो
कामत – तुम्ही कधी उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय कार्यकारणी बैठक बोलवावी अशी विनंती केली का?
शेवाळे- हो, अनेकदा
कामत -लिखित स्वरूपात केली का ?
शेवाळे- नाही
कामत – कोणत्या अधिकाराने तुम्ही ही विनंती उद्धव ठाकरे यांना केली ?
शेवाळे- लोकसभा सदस्य
कामत – उद्धव ठाकरेकडे असलेल्या अधिकाराने यांना तुम्ही विनंती बैठकीसाठी करत होतात ?
शेवाळे- सर्व लोकसभा सदस्य विनंती करत होते म्हणून मी विनंती बैठकीसाठी केली
कामत – सर्व शिवसैनिक सुद्धा या संदर्भात विनंती करत होते ?
शेवाळे – ते कोणाला भेटतच नव्हते आणि सेनेमध्ये अशी कुठलीही प्रक्रिया नाही
कामत – परिशिष्ट 5 मध्ये म्हटल्याप्रमाणे लोकसभेचा सदस्य राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीसाठी विनंती करत होता ?
शेवाळे – हो
कामत – अशी कोणत्या पदावर असलेली व्यक्ती राष्ट्रीय कार्यकारणी बैठक बोलवावी अशी विनंती करत होते ?
शेवाळे- नेते गजानन कीर्तिकर
कामत – सर्व शिवसेना आमदार,नेते, उपनेते, नगरसेवक, कार्यकर्ते आणि शिवसैनिक हे सुद्धा राष्ट्रीय कार्यकारणीसाठी आग्रही होते
शेवाळे- उद्धव ठाकरे हे यापैकी कोणालाच भेटत नव्हते . हे सर्व जण मविआमधील भ्रष्टाचारामुळे त्रस्त होते. म्हणून त्यांना ती बैठक हवी होती. परंतु उद्धव ठाकरे यांनी त्यांना कधीच भेटण्यासाठी वेळ दिली नाही
कामत – उद्धव ठाकरे यांना या सर्वांनी राष्ट्रीय कार्यकारणी बैठक बोलवावी यासाठी विनंती केली होती की नाही?
शेवाळे- ते भेटायला वेळच देत नव्हते
कामत – उद्धव ठाकरे यांनीच ती राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक का बोलवायची?
शेवाळे- ही परंपरा राहिली आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ती परंपरा राहिली आहे
कामत – किती वर्षापासून ही प्रथा शिवसेना पक्षात राहिली आहे ?
शेवाळे – याची मला कल्पना नाही
कामत – 2010 नंतर ही प्रथा सुरू झाली
शेवाळे- मला माहित नाही
कामत – ज्याप्रकारे आधी उत्तर दिलाय त्यानुसार ही प्रथा बाळासाहेब ठाकरे हयात असताना सुद्धा ही प्रथा चालू आहे ?
शेवाळे- बाळासाहेब ठाकरे असताना ही प्रथा सुरू करण्यात आली. 1998 ला घटनेत बदल केल्यानंतर कुठल्याही प्रथा प्रक्रिया फॉलो केल्या नाहीत
कामत- याचा अर्थ 1998 नंतर बाळासाहेब ठाकरे यांनी या संदर्भत कुठलीही प्रोसिजर फॉलो केल्या नाहीत ?
शेवाळे- मी असं कुठेही बोललो नाही की बाळासाहेब ठाकरे यांनी 1998 नंतर कुठलीही प्रोजीसर फॉलो केली नाही
(अध्यक्ष चिडले)
कामत – तुम्ही आधी ज्या प्रकारे उत्तर दिले त्यानुसार आपल्याला असे म्हणायचं होत का ? की बाळासाहेब ठाकरे हयात असताना पासून उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय कार्यकारणी बोलवायची अशी प्रथा होती का ?
शेवाळे – नाही
कामत – असे का होत की उद्धव ठाकरे यांनीच राष्ट्रीय कार्यकारणी बैठक बोलवायची ?
शेवाळे- यापूर्वी सर्व त्यांनाच विनंती करत होते म्हणून
कामत – यापूवी म्हणजे नेमकं कधी?
शेवाळे- माहीत नाही
कामत – सर्वजण विनंती करायचे म्हणजे कोण?
शेवाळे- ज्यांना बोलायचे होते ते
कामत- म्हणजे पक्षातील प्रत्येक जण उद्धव ठाकरे यांना विनंती करायचे
शेवाळे- नाही
कामत – कोणत्या उद्धव ठाकरे यांच्याकडे असे कोणते अधिकार होते त्यामुके सर्वजण राष्ट्रीय कार्यकारणी बोलवण्यासंदर्भात विनंती त्यांना करायचे ?
अध्यक्ष – हा प्रश्न या आधी झाला आहे…ज्यामध्ये सर्वजण त्यांना विनंती करायचे असे उत्तर दिलं आहे त्यांनी
कामत – उद्धव ठाकरे हे पक्ष प्रमुख होते त्यामुळे त्यांना सर्वजण बैठकीसाठी विनंती करायचे ?
शेवाळे- माहीत नाही
कामत – एका न्यायालयीन खटल्याच्या याचिकेत आपण उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख म्हणून उल्लेख केला आहे
शेवाळे – हो
कामत – उद्धव ठाकरे हे नियमित राष्ट्रीय कार्यकारणी आणि प्रतिनिधी सभा बोलवत असत ?
शेवाळे – नाही
कामत – महाविकासआघाडी सरकारमध्ये असताना काही नेत्यांच्या तक्रारी नाराजी होत्या ? महाविकास आघाडी सरकारमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा त्यामागचे कारण होते? हे खरं आहे का ?
शेवाळे- नाही, हे खरं नाही
कामत – हे खरं आहे का तुम्ही एकनाथ शिंदे ची शिवसेना , भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाला पाठींबा देत आहात ?
शेवाळे- हो
कामत – 23 नोव्हेंबर 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पाठिंब्याने , हे खरं आहे का?
शेवाळे – हो, पण मला तारीख आठवत नाही
कामत – देवेंद्र फडणवीस यांनी घाईघाईने सरकार बनवण्यासाठी अजित पवार यांचा पाठींबा घेतला कारण त्यांना शिवसेना पक्षाचा मुख्यमंत्री नको होता? हे खरं आहे का?
शेवाळे – नाही
कामत – मग शिवसेना पक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात फडणवीस आणि अजित पवार यांच्या विरोधात कसा गेला ?
शेवाळे – माहीत नाही
कामत – शिवसेना पक्षाचा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून भाजपने त्यावेळी शिवसेना भाजप युती तोडली का ?
शेवाळे – माहीत नाही
कामत – भाजपच्या विरोधी भूमिकेमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी च्या पाठिंब्याने शिवसेना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले ?
शेवाळे- मला माहित नाही
कामत – एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षाचा पाठींबा नव्हता हे खरे आहे का?
शेवाळे- नाही हे खरे नाही
कामत- एकनाथ शिंदे यांनी पार्टी लीड केली आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला हे चुकीचे आहे , हे बरोबर आहे का ?
शेवाळे : नाही, चुकीचे आहे
कामत -परिशिष्ट 9 मध्ये दिलेल्या माहिती नुसार एकनाथ शिंदे पक्षाचे नेते कधी झाले ?
शेवाळे- मला तारीख आठवत नाही
कामत – एकनाथ शिंदे हे 18 जुलै 2022 रोजी नेते झाले का ?
शेवाळे- जो प्रश्न विचारला आहे. त्याचा परिशिष्ट मध्ये त्याचा उल्लेखच नाही.
दिनांक 18 जुलै 2022 रोजी एकनाथ शिंदे यांची मुख्य नेता म्हणून झाली
कामत – शिवसेना पक्षाच्या घटनेत मुख्यनेता हे पद आहे का?
शेवाळे- आहे
कामत- तुम्ही जी घटना शिवसेना पक्षाची सादर केले आहे त्यामध्ये तुम्ही दाखवा मुख्य नेता पद कुठे आहे ?
शेवाळे – घटनेत दुरुस्ती केली होती.. त्यात मुख्य नेत्याचा पद आहे
कामत – शिवसेना घटनेमध्ये ही कधी दुरुस्ती कधी करण्यात आली…ज्यामध्ये मुख्य नेते पद आहे ?
शेवाळे- मला आठवत नाही
कामत – एकनाथ शिंदे यांना शिवसेनेमध्ये नेतेपदी निवड उद्धव ठाकरे यांनी 23 जानेवारी 2018 रोजी केली हे खरे आहे का?
शेवाळे – तारीख आठवत नाही
कामत : घटनेतली कथित दुरुस्ती ज्यामध्ये मुख्य नेता पद 21 जून 2022 नंतर करण्यात आलं आणि हे बेकायदेशीर आणि याचा कुठला ही संबंध या कार्यवाहीत येत नाही ?
शेवाळे: नाही, हे चूक आहे
कामत : उद्धव ठाकरे हे कायम आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहिलेत आणि त्यांचं त्यांना समर्थन आहे ?
शेवाळे : नाही
कामत : एकनाथ शिंदे यांनी समोरून नेतृत्व नाही केलं तर पक्ष नेतृत्वाच्या पाठीत खंजीर खुपसून नेतृत्वाला आव्हान दिले?
शेवाळे : नाही
सुनील प्रभू यांनी शिवसेना गटनेतील काही महत्त्वाचे कलम वाचून दाखवणे यामध्ये उद्धव ठाकरे यांचे अधिकार पक्षप्रमुख म्हणून आहेत
कामत – तुम्ही जे ठराव ऐकले हे तुम्हाला मान्य आहेत का जे तुम्हाला आता दाखवले गेले
शेवाळे – नाही
कामत – 25 जून 2022 रोजी तुम्ही शिवसेना भवन येथे उपस्थित होतात का?
शेवाळे – हो
कामत – 25 जून 2022 रोजी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत जो ठराव मांडला गेला त्याला तुम्ही पाठिंबा दिला का?
शेवाळे – नाही
कामत – तुमच्या विरोधातील संसदेत अपात्रतेची याचिका प्रलंबित आहे का?
शेवाळे – नाही
कामत – तुम्ही शिवसेना संसदीय पक्षाचे गटनेते म्हणून निवड कधी झाली?
शेवाळे-आठवत नाही
कामत – जून 2022 रोजी झाली की 2022 जूनच्या आधी?
शेवाळे- आठवत नाही
कामत – तुमच्या आधी शिवसेना संसदीय पक्षाची गटनेते म्हणून कोण होते ?
शेवाळे- विनायक राऊत
[ad_2]