Whatsapp New Update How To Share Hd Photo Video In Your Whatsapp Status Marathi Letest News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

WhatsApp HD Photo : व्हॉट्सअॅपने नुकतेच हाय डेफिनेशन म्हणजेच (WhatsApp HD Photo ) HD क्वालिटीमध्ये फोटो आणि व्हिडिओ शेअरिंगचे (WhatsApp Update) अपडेट दिले आहेत. आता व्हॉट्सअॅप नव्या अपडेटसह एचडी फोटो व्हिडिओ स्टेटसमध्ये अपडेट करण्याचा ऑप्सश देत आहे. म्हणजेच तुम्ही तुमच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर एचडी फॉरमॅटमध्ये फोटो आणि व्हिडिओ शेअर करू शकणार आहात. यापूर्वी फोटो शेअर करण्यासाठी डॉक्युमेंट करुन शेअर करावा लागत होता. मात्र आता या फिचर्समुळे HD फोटो शेअर करणं सोपं होणार आहे. 

अँड्रॉइड बीटा व्हर्जन 2.23.26.3 साठी नवीन एचडी फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग फीचर मिळणार आहे. यामध्ये जेव्हा तुम्ही व्हॉट्सअॅप स्टेटस शेअर कराल तेव्हा तुम्हाला एक एचडी आयकॉन दिसेल, ज्याच्या मदतीने तुम्ही एचडी फोटो आणि व्हिडिओ स्टेटस शेअर करू शकाल. व्हॉट्सअॅपचे एचडी स्टेटस फीचर बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. सध्या बीटा टेस्टर याचा वापर करू शकतात. मात्र, लवकरच हे फीचर सर्वसामान्य युजर्ससाठी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

HD फोटो-व्हिडिओ शेअरिंग फीचर कसं वापरायचं?

-आधी तुम्हाला व्हॉट्सअॅप अपडेट करावं लागेल. म्हणजेच गुगल प्ले स्टोअरवरून व्हॉट्सअॅप डाऊनलोड करावं लागेल.
-यानंतर व्हॉट्सअॅप ओपन करा.
-यानंतर बीटा टेस्टर सेक्शनमध्ये जा. 
-यासाठी व्हॉट्सअॅप पेज खाली स्क्रोल करावे लागेल.
-त्यानंतर जॉईन ऑप्शनवर क्लिक करावं लागेल.

Last Seen सोबतच दिसणार Profile Information

व्हॉट्सअॅप आता नव्या रुपातदेखील दिसण्याची शक्यता आहे. कंपनी सध्या काही बीटा टेस्टर्ससोबत उपलब्ध असलेल्या एका नवीन फीचरची चाचणी घेत आहे. खरं तर अँड्रॉइड युजर्ससाठी चॅट विंडोमध्ये लास्ट सीनव्यतिरिक्त प्रोफाईल इन्फॉर्मेशन दाखवण्याचं काम कंपनी करत आहे. म्हणजेच नव्या फीचरअंतर्गत तुम्हाला चॅट विंडोमध्ये युजरच्या लास्ट सीनव्यतिरिक्त प्रोफाईल इन्फॉर्मेशन दिसेल. हे फिचर येत्या काही दिवसातच सगळ्यांसाठी उपलब्ध असणार आहे. व्हॉट्सअॅपच्या नवनव्या गोष्टींवर किंवा फिचर्सवर लक्ष ठेवणाऱ्या ‘Wabetainfo’ या वेबसाईटने हे अपडेट शेअर केले आहे. अँड्रॉइड बीटाच्या 2.23.25.11 व्हर्जनमध्ये हे नवे फीचर पाहायला मिळाले आहे. तुम्हालाही आधी कंपनीचे लेटेस्ट फीचर्स मिळवायचे असतील तर तुम्ही कंपनीच्या बीटा प्रोग्रॅमसाठी नोंदणी करू शकता.

नव्या भन्नाट फिचर्सवर काम सुरु

व्हॉट्सअॅप अनेक नवीन फीचर्सवर काम करत आहे. अलीकडच्या काळात कंपनीने शॉर्टकट बटण दिले आहेत, जे आपल्याला चॅटजीपीटी सारख्या AIच्या माध्यमातून चॅटबॉट्सशी संवाद साधू शकतात. ग्रुप संभाषणासाठी नवीन व्हॉइस चॅट, अँड्रॉइड आणि आयओएससाठी ईमेल व्हेरिफिकेशन यावरदेखी कंपनीचं काम सुरु आहे. येत्या काळात व्हॉट्सअॅप आपल्याला नवनव्या फिचर्स सोबत मिळणार आहे.

इतर महत्वाची बातमी-

Smart Driving Tips : धुक्यात गाडी चालवताना ‘या’ ट्रिक्स फॉलो करा नाहीतर धुक्याची चादर जीवघेणी ठरू शकते!

[ad_2]

Related posts