[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Apple Security : अॅपलच्या आयफोनची किंमत इतकी जास्त आहे की, चुकून (Apple Security ) कधी चोरी झाली तर सामान्य माणसाची झोप उडेल. चोरी झाल्यास पैसे वाया जातात, तसेच डेटा लीक होण्याचा ही धोका असतो. जर चोराला चुकून तुमचा पासवर्ड माहित झाला तर तो तुमच्या आयफोनचा डेटा मिळवू शकतो. तसेच तुमच्या बँक अकाऊंटमधून वर्षानुवर्षांची कमाई, खासगी गोष्टींचा चुकीच्या पद्धतीने वापर होऊ शकतो. आयफोन युजर्सच्या सुरक्षेला पुढच्या पातळीवर नेण्यासाठी अॅपल एका नव्या सिक्युरिटी फीचरवर काम करत आहे. ज्यामुळे तुमचा डेटा सुरक्षित राहू शकणार आहे. जाणून घ्या काय आहे ते…
‘या’ दमदार फीचरवर काम सुरू
वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, अॅपल आपल्या नव्या iOS 17.3 अपडेटमध्ये “Stolen Device Protection” नावाचा मोड ऑफर करणार आहे. हे फीचर सुरू झाल्यानंतर जर तुमचा आयफोन तुमचे प्रायमरी लोकेशन नसलेल्या लोकेशनमध्ये राहत असेल तर हा मोड आपोआप ऑन होईल आणि आयफोनमधून सेन्सिटिव्ह डेटा अॅक्सेस करण्यासाठी पासकोडव्यतिरिक्त फेस आयडी बायोमेट्रिक देखील टाकावे लागेल. केवळ माहिती अॅक्सेस करण्यासाठीच नाही तर अॅपल आयडी बदलण्यासाठी आणि फोन रिसेट करण्यासाठी तुम्हाला या दोन स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. त्यांच्याशिवाय तुमच्या आयफोनमधून कोणीही काहीही काढू शकणार नाही. हे नवे फीचर अॅपल युजर्सच्या सुरक्षिततेसाठी काम करेल आणि त्यांना मोठ्या अडचणीपासून वाचवणार आहे.
‘Lost mode’ खास सिक्युरिटी फीचर
अॅपलने आयफोन युजर्सना ‘Lost mode’ नावाचे फीचर दिले आहे, ज्याच्या मदतीने युजर्स आपला हरवलेला आयफोन हरवलेला म्हणून शोधू करू शकतात. युझर्स iCloud द्वारे ते चालू करू शकतात ज्यानंतर ते डिसेबल होते आणि ओनर त्याचे लोकेशन देखील शेअर करते. जे लोक iOS17.3 बीटा वापरत आहेत ते स्टोलन मोड वापरू शकतात. सेटिंग्सच्या आत पासकोडमध्ये तुम्हाला हा पर्याय मिळेल.
NameDrop मुळे डेटा लीक होण्याचा धोका
अॅपलने नुकतेच iOS 17 अपडेट सादर केले असून त्यात ‘नेमड्रॉप’ नावाचे नवे फिचर होते. आयफोन युजर्ससोबत स्ट्रीमिंग कॉन्टॅक्ट्स शेअर करणे हा त्याचा उद्देश होता. पेनसिल्व्हेनियाच्या सिटी ऑफ चेस्ट पोलिस विभागाने अलर्ट जारी केला आहे. यामध्ये एअरड्रॉपचा धोका सांगण्यात आला आहे. NameDrop फीचरचा गैरवापर अनोळखी व्यक्तीही करू शकते, असा दावा पोलिसांनी केला आहे. कारण ठराविक मर्यादेत आल्यानंतर फोनची माहिती शेअर केली जाते. विशेषत: जेव्हा नेमड्रॉप एखाद्या अनोळखी व्यक्तीने अॅक्टिव्हेट केला असेल, तेव्हा आपली माहिती किंवा डेटा शेअर होण्याची दाट शक्यता आहे.
इतर महत्वाची बातमी-
iPhone Spam Call : आयफोनवरील स्पॅम कॉलची भानगडच संपणार, सेटिंग्जमध्ये करा ‘हे’ छोटे बदल
[ad_2]