[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
India vs South Africa 3rd T20I Live Streaming: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यामध्ये आज अखेरचा टी 20 सामना होत आहे. पहिला सामना पावसामुळे धुतला गेला होता. तर दुसऱ्या टी 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने (IND vs SA) विजय मिळवला. त्यामुळे आता तिसरा सामना कोण जिंकणार ? याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय. आफ्रिका अखेरचा टी 20 सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या प्रयत्नाने मैदानात उतरले, तर टीम इंडिया बरोबरी करण्याच्या इराद्याने खेळणार आहे. सूर्याच्या नेतृत्वातील युवा टीम इंडियापुढे अनुभवी आफ्रिकेचे तगडे आव्हान असेल.
कुठे होणार सामना ?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा आणि अखेरचा टी 20 सामना आज, जोहान्सबर्गच्या न्यू वांडरर्स स्टेडियममध्ये होणार आहे. आफ्रिका हा सामना जिंकून मालिका 2-0 च्या फरकाने जिंकण्याचा प्रयत्न करेल. तर भारतीय संघ मालिका 1-1 ने बरोबरीत करण्याच्या इरद्याने मैदानात उतरेल. दोन्ही संघामध्ये काटें की टक्कर होणार, ही शक्यता नाकारता येणार नाही.
कधी होणार सामना ?
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यादरम्यान तिसरा टी 20 सामना आज, 14 डिसेंबर रोजी होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार, रात्री 8.30 वाजता होणार आहे.
कुठे पाहाल सामना ?
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील तिसरा टी 20 सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहता येईल. मोबाईलवरुन डिज्नी प्लस हॉटस्टारवर मोफत सामना पाहता येईल.
भारत आणि दक्षिण आफ्रिका हेड टू हेड, कोण वरचढं?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आतापर्यंत 26 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. यामध्ये 13 सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली आहे. तर दक्षिण आफ्रिकेने 11 सामने जिंकले आहेत. दोन सामन्याचा निकाल लागला नाही.
तिसऱ्या टी 20 सामन्यासाठी टीम इंडियाचा संपूर्ण संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मुकेश कुमार, श्रेयस अय्यर, दीपक चाहर, रवि बिश्नोई, ईशान किशन, वाशिंगटन सुंदर, रुतुराज गायकवाड़.
दक्षिण अफ्रीकाचं स्कॉव्ड
रीजा हेंड्रिक्स, मैथ्यू ब्रीट्जके, एडेन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेविड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, एंडिले फेहलुकवायो, लिज़ाद विलियम्स, तबरेज शम्सी, केशव महाराज, नंदरे बर्गर, ओटनील बार्टमैन, डोनोवन फरेरा.
आणखी वाचा :
Shreyas Iyer KKR Captain : गौतम गंभीरची कोलकातामध्ये ग्रँड एन्ट्री होताच संघाचा कॅप्टन सुद्धा बदलला; नितीश राणाचा रोल बदलला
[ad_2]