Poco C65 With 50 Megapixel Rear Camera Launched In India Price Specifications

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Poco C65 Mobile : टेक कंपन्या सध्या आपल्या ग्राहकांना खूश (latest phone) करण्यासाठी एकापाठोपाठ एक फोन आणत आहेत. विवो, ओप्पो, रेडमी आणि रियलमीपासून ते सॅमसंगच्या फोन्सपर्यंत बाजारात धुमाकूळ घातला आहे. तर दुसरीकडे पोकोचे फोनही ग्राहकांची मने जिंकताना दिसत आहेत. जर तुम्ही पोकोचे युजर्स असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. पोको कंपनीने आपल्या ग्राहकांना खूश करण्यासाठी नवा फोन Poco C65 लाँच केला आहे. हा एक बजेट फोन आहे. Poco C65(Poco C65 Mobile)  मध्ये 50 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा, मीडियाटेक हेलियो G85  चिपसेट आणि 8GB पर्यंत रॅम देण्यात आली आहे. स्मार्टफोनला दोन वर्षांसाठी अँड्रॉइड ओएसचे प्रोटेक्शन मिळेल.

भारतात Poco C65 ची किंमत किती ?

भारतात Poco C65 स्मार्टफोन तीन व्हेरियंटसह सादर करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या 4 जीबी + 128 जीबी स्टोरेजची किंमत 8,499 रुपये आहे, तर 6 जीबी + 128 जीबी 9,499 रुपये  तर 8 जीबी + 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे.

हा फोन मॅट ब्लॅक आणि पेस्टल ब्लू कलर ऑप्शनसह लॉंच करण्यात आला आहे. फ्लिपकार्टवरून खरेदीसाठी उपलब्ध असेल. ग्राहकांना 1000 रुपयांपर्यंतची सूट घेता येईल, परंतु यासाठी युझर्सला आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डद्वारे पैसे द्यावे लागतील.

Poco C65  स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स

पोको सी 65 स्मार्टफोनमध्ये 90 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह 6.74 इंचाची एचडी+ (720 बाय 1,600 पिक्सल) एलसीडी स्क्रीन आहे. स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G85 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे.याशिवाय हा फोन 8GB  पर्यंत रॅम आणि256GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज देत आहे. जी मायक्रोएसडी कार्ड स्लॉटद्वारे वाढवता येऊ शकते. हा फोन अँड्रॉइड 13 वर  MIUI 14 आउट-ऑफ-द-बॉक्स सह चालतो.Poco C65  मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात f/1.8 अपर्चरसह 50 MPचा प्रायमरी कॅमेरा आहे. याशिवाय 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे.

सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 4G एलटीई, वायफाय, ब्लूटूथ 5.3, जीपीएसचा समावेश आहे.Poco C65  मध्ये 5,000 एमएएच बॅटरी आहे जी यूएसबी टाइप-सी पोर्टद्वारे 18 वॉटवर चार्ज केली जाऊ शकते. यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. याची लांबी 168x78x8x8.09 मिमी असून वजन 192 ग्रॅम आहे.

इतर महत्वाची बातमी-

Money Transfer : चुकीच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर? टेन्शन घेऊ नका, ताबडतोब ‘या’ नंबरवर कॉल करा, पैसे परत मिळतील!

[ad_2]

Related posts