Ipl 2024 Auction Gerald Coetzee Said Played Under Ms Dhoni Would Be A Massive Opportunity For Me Will Csk Bid For Him Upto 20 Crores

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Gerald Coetzee IPL : दक्षिण आफ्रिकेचा युवा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्जी (Gerald Coetzee) याने आयपीएल लिलावाआधी (IPL Auction 2024) मोठं वक्तव्य केलेय. गेराल्ड कोएत्जीने आयपीएलचा (Gerald Coetzee, IPL) सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई संघात खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. गेराल्ड कोएत्जी याने नुकत्याच झालेल्या विश्वचषकात भेदक मारा करत सर्वांनाच प्रभावित केले होते. भारतीय खेळपट्ट्यावर गेराल्ड कोएत्जी याने आफ्रिकेकडून सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या. गेराल्ड कोएत्जी याने धोनीच्या नेतृत्वात आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली. चेन्नई गेराल्ड कोएत्जी याच्यावर डाव खेळणार का? याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. गेराल्ड कोएत्जी याला घेण्यासाठी सर्वच संघामध्ये चुसर दिसणार आहे. त्यामुळे हा युवा गोलंदाज कुणाच्या ताफ्यात जाणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

गेराल्ड कोएत्जीवर लागणार मोठी बोली – 

गेराल्ड कोएत्जी भेदक गोलंदाजीसोबत स्विंगचा माराही करतो. सुरुवातीला आणि डेथ ओव्हरमध्येही गोलंदाजी करण्यात गेराल्ड कोएत्जी माहीर आहे. इतकेच नाही तर तळाला मोठे फटके मारण्याची क्षमताही गेराल्ड कोएत्जी याच्यामध्ये आहे. त्यामुळे प्रत्येक संघाची नजर त्याच्यावर असेल. दुबईत होत असलेल्या आयपीएल लिलावात गेराल्ड कोएत्जी याच्यावर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. क्रिकेट तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, गेराल्ड कोएत्जी यंदाच्या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरु शकतोो. लिलावाआधी झालेल्या मॉक ऑक्शनमध्ये गुजरातने त्याच्यावर 18 कोटींची बोली लावली होती. अशात आज गेराल्ड कोएत्जी याच्यावर 20 कोटींपर्यंत बोली लागण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. 

 धोनीच्या नेतृत्वात खेळायचेय –

रेवस्पॉर्ट्ज संकेतस्थळाच्या एका रिपोर्ट्सनुसार, गेराल्ड कोएत्जी याला धोनीच्या नेतृत्वात खेळायचं आहे. तो म्हणाला की,  ” जर मला  धोनीच्या नेतृत्वाखाली खेळण्याची संधी मिळाली तर माझ्यासाठी महान कर्णधारांपैकी एका कर्णधाराकडून खेळण्याची आणि शिकण्याची ही उत्तम संधी असेल. सुपर किंग्स फॅमिली स्पेशल आहे.” गेराल्ड कोएत्जी याच्यावर चेन्नई डाव खेळणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.  

गुजरातकडे सर्वाधिक पैसा – 
आरसीबीच्या पर्समध्ये 23.25 कोटी रुपये शिल्लक आहेत. आरसीबीने 11 खेळाडू रिलिज केले तर कॅमरुन ग्रीनला ट्रेड केले. जोश हेजलवुड, वानिंदु हसरंगा, हर्षल पटेल, फिन एलन, माइकल ब्रेसवेल, डेविड विली, वेन पार्नेल, सोनू यादव, अविनाश सिंह, सिद्धार्थ कौल आणि केदार जाधव यांना आरसीबीने रिलीज केले.  सनराइजर्स हैदराबाद संघाकडे 34 कोटी रुपये शिल्लक आहेत. कोलकात्याकडे 32.7 कोटी शिल्लक आहेत. चेन्नई, पंजाब, दिल्ली आणि मुंबईच्या संघाकडे अनुक्रम 31.4 कोटी, 29.1 कोटी, 28.95 कोटी आणि 17.75 कोटी शिल्लक आहेत. त्याशिवाय राजस्थानकडे 14.5 कोटी शिल्लक आहेत. 

आणखी वाचा : 

IPL च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार, कर्णधार दिसणार ऑक्शन टेबलवर

IPL चा आज दुबईत लिलाव, गुजरातकडे सर्वाधिक पैसा,  262 कोटींचा होणार चुराडा 

IPL 2024 Auction Updates: आयपीएल लिलावापूर्वी मोठी बातमी; ‘या’ 3 स्टार खेळाडूंनी नावं घेतली मागे



[ad_2]

Related posts