IPL Auction 2024 Rachin Ravindra New Zealand All Rounder Signs For Chennai Super Kings In 1.8 Crore Know All Details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IPL Auction 2024, Rachin Ravindra: आयपीएल 2024 (IPL 2024) लिलाव सुरू झाला असून, अनेक खेळाडूंच्या नावांवर बोली लावण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेता कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) आयपीएलच्या आजवरच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादनं (Sunrisers Hyderabad) 20 कोटी 50 लाख कोटींची विक्रमी बोली लावत आपल्या ताफ्यात सामावून घेतलं आहे. पण खरा धक्का तेव्हा बसला ज्यावेळी वर्ल्डकप गाजवणाऱ्या रचिन रवींद्रला (Rachin Ravindra) खूपच कमी बोली लावण्यात आली. न्यूझीलंडचा ऑलराऊंडर रचिन रवींद्रवर सर्वाधिक बोली लागेल, असा अंदाज लावला जात होता. 

न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्रवर खूप कमी बोली लावली, तर त्याच्या नावासाठी मोठी बोली अपेक्षित होती. रचिन रवींद्रला चेन्नई सुपर किंग्सनं अवघ्या 1 कोटी 80 लाख रुपयांना विकत घेतलं आहे. या खेळाडूच्या नावावरही मोठी बोली लागेल, अशी अपेक्षा होती. मात्र, रचिन रवींद्रवर सर्वात कमी बोली लागली. 

विश्वचषक विजेत्या कर्णधारावर सनरायझर्स हैदराबादची विक्रमी बोली

पॅट कमिन्स आजवरच्या आयपीएलच्या (IPL 2024) इतिहासातील सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू ठरला आहे. पॅट कमिन्सवर सनरायझर्स हैदराबादनं (Sunrisers Hyderabad) सर्वाधिक बोली लावत त्याला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतलं आहे. सनरायझर्स हैदराबादनं 20 कोटी 50 लाख रुपयांची विक्रमी बोली लावली आहे. दरम्यान, यापूर्वी आयपीएलमध्ये सर्वाधिक बोली सॅम करनवर लावण्यात आली होती. सॅम करनवर पंजाबनं 18 कोटी रुपयांची बोली लावली होती. 

यंदाच्या लिलावात 23 खेळाडूंची मूळ किंमत 2 कोटी 

यंदाच्या लिलावासाठी दोन सहयोगी देशांतील खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे. IPL 2024 साठी सर्व 10 संघांमध्ये एकूण 77 खेळाडूंची आवश्यकता आहे. याचा अर्थ 333 निवडलेल्या खेळाडूंपैकी केवळ 77 खेळाडूंचा लिलाव होईल. 333 खेळाडूंच्या यादीत 23 खेळाडू आहेत ज्यांची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे. तर 13 खेळाडूंची मूळ किंमत 1.5 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. याशिवाय 1 कोटी, 50 लाख, 75 लाख, 40 लाख, 30 लाख आणि 20 लाख रुपयांची मूळ किंमत असलेल्या खेळाडूंचाही या यादीत समावेश आहे.

कुठे पार पडणार लिलाव?

आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच लिलाव देशाबाहेर पार पडणार आहे. दुबईतील  कोका कोला एरीना येथे लिलावाचं आयोजन करण्यात आलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

[ad_2]

Related posts