Billionaires List Savitri Jindal Richest Woman Beats All Big Businessman In 2023 Billionaires List Marathi News 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Billionaires list : भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत (billionaires list)  एक महिलेचाही समावेश झाला आहे. सावित्री जिंदाल (savitri jindal) या भारतातील सर्वात श्रीमंत  महिला ठरल्या आहेत. 2023 मध्ये कमाईच्या बाबतीत त्यांनी बड्या-बड्या उद्योगपतींना मागं टाकलं आहे. ओ.पी. जिंदाल समूहाच्या अध्यक्षा सावित्री जिंदाल यांच्या संपत्तीत 9.6 अब्ज डॉलरची मोठी वाढ झाली आहे. ही वाढ अंबानी आणि बिर्ला यांच्यासारख्या दिग्गजांच्या संपत्तीतीत (सावित्री जिंदाल नेट वर्थ) झालेलया वाढीपेक्षा कितीतरी जास्त आहे. एकीकडे त्यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाल्याचा आनंदोत्सव साजरा होत असताना दुसरीकडे त्यांच्या कुटुंबावर संकट येत आहेत. 

मुंबई पोलिसांनी सावित्री जिंदाल यांचा मुलगा आणि जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सावित्री जिंदाल यांना 9 मुले आहेत. फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, सावित्री जिंदाल या भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत चौथ्या स्थानावर पोहोचल्या आहेत.सावित्री जिंदाल यांचे पती जिंदाल ग्रुपचे संस्थापक ओमप्रकाश जिंदाल यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्यानंतर सावित्री जिंदाल यांनी समूहाची जबाबदारी स्वीकारली. कोरोनाच्या काळात सावित्री जिंदाल यांच्या संपत्तीत सुमारे पन्नास टक्क्यांची घट झाली होती. त्यावेळी झालेल्या प्रचंड नुकसानीनंतर त्याच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. आज त्यांनी जिंदाल ग्रुपला एका नव्या उंचीवर नेले आहे.

सावित्री जिंदालच्या समूहामध्ये JSW स्टील, जिंदाल स्टील अँड पॉवर, JSW एनर्जी, जिंदाल सॉ, जिंदाल स्टेनलेस आणि गुंतवणूक कंपनी JSW होल्डिंग सारख्या सूचीबद्ध कंपन्यांचा समावेश आहे. ओपी जिंदाल ग्रुपकडे पोर्ट ऑपरेटर JSW इन्फ्रास्ट्रक्चरची 83 टक्के मालकी आहे. जी यावर्षी ऑक्टोबरमध्ये सूचीबद्ध झाली होती.

मुकेश अंबानींच्या संपत्तीत किती वाढ?

ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे (RIL) चेअरमन मुकेश अंबानी यांच्या संपत्तीमध्ये 2023 मध्ये सुमारे 5 बिलियन डॉलरची वाढ झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती 92.3 अब्ज डॉलर्स आहे.

2023 मध्ये अब्जाधीशांनी किती कमाई केली?

जिंदाल ग्रुपनंतर एचसीएल टेकचे शिव नाडर या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. 2023 मध्ये त्यांची एकूण संपत्ती अंदाजे 8 अब्ज डॉलरने वाढली आहे. शिव नाडर यांची संपत्ती सुमारे 32.6 अब्ज डॉलर आहे. यानंतर डीएलएफ रियल्टी टायकून केपी सिंह यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. 2023 मध्ये त्यांची संपत्ती 7 अब्ज डॉलरने वाढली. त्यानंतर एकूण संपत्ती 15.4 अब्ज डॉलर झाली. कुमार मंगलम बिर्ला आणि शापूर मिस्त्री या दोघांच्या संपत्तीत 2023  मध्ये 6.3 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 5.2 अब्ज डॉलर आणि सन फार्माचे एमडी दिलीप सांघवी यांची संपत्ती 4.7 बिलियन डॉलरने वाढली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

जगातील श्रीमंतांची यादी जाहीर, अंबानी-अदानींना कितवं स्थान? सविस्तर माहिती एका क्लिकवर  

[ad_2]

Related posts