IPL Auction 2024 Spencer Johnson Bought By Gujarat Titans In The Auction For Rs 10 Crore Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : आयपीएल लिलावात (IPL Auction 2024) गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) ऑस्ट्रेलियन खेळाडू स्पेन्सर जॉन्सनला (Spensar Jhonson) 10 कोटी रुपयांना विकत घेतले. स्पेन्सर जॉन्सनची मूळ किंमत केवळ 50 लाख रुपये असली तरी या खेळाडूसाठी मोठी बोली लागली होती. गुजरात टायटन्सशिवाय कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्सने स्पेन्सर जॉन्सनसाठी बोली लावली. मात्र, गुजरात टायटन्सने 10 कोटी रुपये खर्च करून स्पेन्सर जॉन्सनला आपल्या संघाचा भाग बनवले.

गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये जोरदार बिडींग

स्पेंसर जॉन्सनसाठी गुजरात टायटन्सने पहिली बोली लावली. यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने प्रवेश केला. त्यानंतर गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात स्पेन्सर जॉन्सनसाठी बिडींग सुरु झाले. पण गुजरात टायटन्सने 10 कोटी रुपये खर्च करून स्पेन्सर जॉन्सनला आपल्या संघात समाविष्ट करण्यात यश मिळवले.

स्पेंसर जॉन्सनचं करिअर 

ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय संघाव्यतिरिक्त, स्पेन्सर जॉन्सन बिग बॅशमध्ये अॅडलेड स्ट्रायकर्स, ब्रिस्बेन हीट, दक्षिण ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया-ए, लॉस एंजेलिस नाइट रायडर्स आणि सरे जग्वार्सकडून खेळला आहे. स्पेन्सर जॉन्सनने आतापर्यंत 2 टी-20 आणि 1 वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे. स्पेन्सर जॉन्सनने 2 टी-20 सामन्यात 8.27 इकॉनॉमी आणि 31.00 च्या सरासरीने 2 बळी घेतले आहेत. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियासाठी पहिल्या वनडेमध्ये स्पेन्सर जॉन्सनने 7.62 च्या इकॉनॉमीने धावा दिल्या आहेत.

स्पेन्सर जॉन्सन हा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. हा गोलंदाज त्याच्या वेगासाठी ओळखला जातो. विशेषत: पॉवरप्ले ओव्हर्समध्ये स्पेंसर जॉन्सन हे विरोधी फलंदाजांसाठी मोठे आव्हान आहे. स्पेन्सर जॉन्सनचा इनस्विंग चेंडू खेळणे उजव्या हाताच्या फलंदाजासाठी सोपे नाही. मात्र, स्पेन्सर जॉन्सन गुजरात टायटन्सच्या अपेक्षांवर खरा उतरू शकतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

मिचेल स्टार्कवर सर्वाधिक बोली

मिचेल स्टार्कसाठी चार संघामध्ये बिडिंग टेबलवर लढत झाली.  मिचेल स्टार्कसाठी दिल्ली आणि मुंबई या दोन संघामध्ये आधी लढत झाली. 10 कोटींपर्यंत बोली पोहचल्यानंतर दिल्लीने माघार घेतली. त्यानंतर कोलकात्याने रस दाखवला. मुंबईने माघार घेतली. पण त्याचवेळी गुजरातनेही रस दाखवला. कोलकाता आणि गुजरात या दोन संघामध्ये स्टार्कसाठी चुरस पाहायला मिळाली. अखेर कोलकात्याने स्टार्कला ताफ्यात घेतले. कोलकात्याने स्टार्कसाठी 24.75 कोटी रुपये खर्च केले. 

यंदाच्या लिलावात 23 खेळाडूंची मूळ किंमत 2 कोटी

यंदाच्या लिलावासाठी दोन सहयोगी देशांतील खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे. IPL 2024 साठी सर्व 10 संघांमध्ये एकूण 77 खेळाडूंची आवश्यकता आहे. याचा अर्थ 333 निवडलेल्या खेळाडूंपैकी केवळ 77 खेळाडूंचा लिलाव होईल. 333 खेळाडूंच्या यादीत 23 खेळाडू आहेत ज्यांची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे. तर 13 खेळाडूंची मूळ किंमत 1.5 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. याशिवाय 1 कोटी, 50 लाख, 75 लाख, 40 लाख, 30 लाख आणि 20 लाख रुपयांची मूळ किंमत असलेल्या खेळाडूंचाही या यादीत समावेश आहे. 

हेही वाचा : 

IPL Auction 2024 : राजस्थान रॉयल्सचा विदर्भ एक्सप्रेसवर कोट्यावधी रुपयांचा खर्च, शुभम दुबेवर बेस प्राईसच्या 29 पट लावली बोली

[ad_2]

Related posts