How To Update Aadhaar Card The Deadline For Free Update Of Aadhaar Card Has Been Extended

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

How To Update ADHAR Card : आधार कार्ड हे अतिशय महत्त्वाचं कागदपत्र असून ते अपडेट असणं आवश्यक आहे. आधार कार्ड (ADHAR Card) मोफत अपडेट करण्यासाठी सरकारने 14 डिसेंबर ही मुदत दिली होती. मात्र आता मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत सरकारने तीन महिन्यांनी वाढवली आहे. आता 14 मार्च 2024 पर्यंत आधार कार्ड मोफत अपडेट करता येणार आहे.  

आधार केंद्रावरील लांब रांगेपासून वाचण्यासाठी तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट बुक करू शकता, ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने तुम्हाला आधार अपडेट करता येणार आहे शिवाय आधार केंद्र किंवा CSC केंद्रावर जाऊनही तुम्ही माहिती अपडेट करु शकता. 

महत्वाचं म्हणजे आधार कार्ड मोफत अपडेटची सुविधा फक्त ऑनलाइनसाठी उपलब्ध आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटवरून तुम्ही ही माहिती अपडेट करू शकता. सततच्या अपडेटमुळे आधार हा विश्वासार्ह स्त्रोत बनतो. यामुळे तुम्हाला खूप मदत ही होते. त्यामुळेच ते वेळोवेळी अपडेट करणं तितकंच महत्वाचं आहे फ्री अपडेटची तारीखही 14 मार्च पर्यंत वाढवल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे.

आधार कार्ड अपडेट करायच्या महत्वाच्या स्टेप्स

-मोबाइल किंवा लॅपटॉपवरून यूआयडीएआयच्या वेबसाइटला भेट द्या. यानंतर अपडेट आधारच्या पर्यायावर क्लिक करा. आता आधार क्रमांक टाकून ओटीपीद्वारे लॉगिन करा.

-त्यानंतर डॉक्युमेंट अपडेटवर क्लिक करा आणि व्हेरिफिकेशन करा. आता खालील ड्रॉप लिस्टमधून ओळखपत्राची स्कॅन केलेली प्रत आणि पत्त्याचा पुरावा अपलोड करा.

-आता सबमिटवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट नंबर मिळेल आणि फॉर्म सबमिट होईल. रिक्वेस्ट नंबरवरून अपडेटची स्टेटस देखील तपासू शकाल. काही दिवसांनी तुमचे आधार अपडेट होईल.

आधार कार्ड अपडेट करा अन् फसवणूक टाळा !

फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी बायोमेट्रिक अपडेटकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. यूआयडीएआयने दर 10 वर्षांनी आधार कार्डची माहिती अपडेट करणं बंधनकारक केलं आहे. आपली माहिती अचूक आणि अपडेट आहे याची खात्री करणं देखील आवश्यक आहे. आधार फ्रॉड टाळण्यासाठी अपडेट्स देखील आवश्यक आहेत. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाल्यास पत्ताही बदलावा लागतो. त्यामुळे 14 तारखेच्या आत तुमचं आधार अपडेट करुन घ्या.

इतर महत्वाची बातमी-

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना; जाणून घ्या 10 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर

 

 

 

 

[ad_2]

Related posts