Maratha Reservation Sunil Kawale Sucide Vinod Patil Appeal To The Maratha Protesters

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या एका तरुणाने मुंबईत गळफास घेत  आत्महत्या केल्याचा दावा, मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील (Vinod Patil) यांनी केला आहे. कावळे यांच्या आत्महत्येनंतर विनोद पाटील यांनी मराठा आंदोलकांना कळकळीचे आवाहन केले आहे.   खचून जाऊ नका, लढाई अर्ध्यावर टाकून तर जाऊच नका असे आवाहन विनोद पाटील यांनी केले आहे.  

आपल्या मागण्या मंजूर करून घेण्याचा आत्महत्या हा योग्य मार्ग नाही. काळाच्या छाताडावर बसून अनेक संग्राम आपल्या या लढवय्या जातीने इतिहासात जिंकले आहेत. खचून जाऊ नका, लढाई अर्ध्यावर टाकून तर जाऊच नका, असे आवाहन विनोद पाटील यांनी केले आहे. 

सरकारने तात्काळ पाऊले उचलावी

तसेच विनोद पाटलांनी सरकारला देखील इशारा दिला आहे. मराठा आरक्षणाचा विषय दिवसेंदिवस अधिक गंभीर होत जाणार आहे. मराठा आरक्षण हा विषय आमच्या जगण्याशी संबंधित आहे, हे आता तरी मान्य करा. एवढे बळी गेल्यावरही तुम्हाला जाग येत नाही. यापेक्षा मराठा युवकांच्या आत्महत्या होऊ नये, यासाठी सरकारने तात्काळ पाऊले उचलावी. नाहीतर उद्रेक अटळ आहे. 

  सुनील कावळे (45 वर्ष) (Sunil Kawale)  असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास घेऊन या तरुणाने आत्महत्या केली आहे. सुनील कावळे जालन्याचे (Sunil Kawale Jalna) रहिवाशी होते. त्यांच्याकडे असलेल्या बॅगमध्ये सुसाईड नोट सापडली आहे .  मध्यरात्री त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर येत आहे. खचून जाऊ नका, लढाई अर्ध्यावर टाकून तर जाऊच नका असे आवाहन विनोद पाटील यांनी केले आहे. 

हे ही वाचा :        

जालन्याच्या तरूणाने मुंबईत आयुष्य संपवलं; आरक्षणासाठी टोकाचं पाऊल, विनोद पाटील यांचा दावा



[ad_2]

Related posts