Gaganyaan Mission On October 21 Isro Will Launch The First Test Flight To Ensure The Safety Of Astronauts

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Gaganyaan Mission Update : इस्रो (ISRO) गगनयान मिशन अंतर्गत पहिली चाचणी उड्डाण प्रक्षेपित करणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था गगनयान मिशन अंतर्गत 21 ऑक्टोबर रोजी चाचणी उड्डाणे सुरू करणार आहेत, इस्रोने याबाबत माहिती दिली आहे. गगनयान मोहिमेदरम्यान अंतराळवीरांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे चाचणी उड्डाण करण्यात येणार आहे. हाच यामागचा मूळ उद्देश आहे. चाचणी दरम्यान मॉड्यूल अंतराळात नेले जाईल. यासह ते पृथ्वीवर परत आणून बंगालच्या उपसागरात उतरवले जाईल. 

 

इस्रोकडून या उड्डाण चाचणीला अबॉर्ट टेस्ट असं नाव देण्यात आलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने दिलेल्या माहितीनुसार, गगनयान अंतराळ मोहिमेअंतर्गत 21 ऑक्टोबर रोजी पहिली अबॉर्ट टेस्ट करण्यात येणार आहे. क्रू एस्केप सिस्टीमची इनफ्लाइट अॅबॉर्ट टेस्ट (Abort Test) टेस्ट व्हेईकल अॅबॉर्ट मिशन-1 (टीव्ही-डी1) द्वारे घेतली जाईल.

 

गगनयान मोहिमेदरम्यान अंतराळवीरांची सुरक्षितता सुनिश्चित करणे हा त्याचा उद्देश आहे. चाचणी दरम्यान गगनयानचं मॉड्यूल अंतराळात नेलं जाईल. त्यानंतर ते ठराविक उंचीपर्य़ंत नेऊन पुन्हा पृथ्वीवर आणलं जाईल. मॉड्यूलने ठराविक उंची गाठल्यानंतर ते पृथ्वीवर परत आणण्यासाठी बंगालच्या उपसागरात उतरवलं जाईल. 

 

गगनयान मोहिम इस्रोची पहिली मानवी अंतराळ मोहिम असेल. या मोहिमेमध्ये अंतराळवीर पाठवण्याची तयारी सुरू आहे. गगनयान हे भारतीय अंतराळ संस्थेची पहिली मानवी अंतराळ मोहीम असेल. या मोहीमे अंतर्गत तीन अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्यात येणार आहे. भारतीय हवाई दलातील वैमानिक अंतराळवीर म्हणून अंतराळात जातील. यासाठी त्यांचं प्रशिक्षणही सुरू आहे. गगनयान अंतराळ मोहिमेसाठी पहिले रोबोट तयार केले जात आहेत. आधी रोबोटिक चाचणी होईल त्यानंतर मानवाला अंतराळात पाठवलं जाईल.
 

[ad_2]

Related posts