[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
India vs Pakistan T20 World Cup 2024 : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) हे जगातील दोन मातब्बर क्रिकेट संघ आहेत. जेव्हा जेव्हा हे दोन संघ समोरासमोर असतात, तेव्हा जगातील प्रत्येक क्रिकेट चाहत्याला त्यांच्यामध्ये खेळल्या गेलेल्या सामन्याचा आनंद घ्यायचा असतो. कारण भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामन्यात जो थरार पाहायला मिळतो तो या दोन देशांमधील इतर कोणत्याही सामन्यात दिसत नाही. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत हे दोन संघ शेवटचे भिडले होते ज्यात भारताने विजय मिळवला होता. आता या दोन शेजारी देशांमधील आणखी एका सामन्याची रूपरेषा समोर आली आहे.
India vs Pakistan in the T20 World Cup 2024 in New York is likely to be a “Day Game” to suit the timing of the Indian audience. [RevSportz] pic.twitter.com/UxB4b6LUam
— Johns. (@CricCrazyJohns) December 21, 2023
कधी होणार सामना?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पुढील सामना (IND vs PAK) T20 विश्वचषक 2024 मध्ये दिसेल. दोन्ही देशांचे करोडो चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मिळलेल्या माहितीनुसार, T20 विश्वचषकादरम्यान न्यूयॉर्कमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना दिवसा खेळवला जाणार आहे. भारत आणि पाकिस्तानच्या करोडो क्रिकेट चाहत्यांना या सामन्याचा आनंद घेता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकेतील न्यूयाॅर्कमध्ये 8 किंवा 9 जून रोजी हा सामना होण्याची शक्यता आहे.
India Vs Pakistan T20 World Cup match likely to happen on 8th or 9th June in New York. (Revsportz). pic.twitter.com/vIiia5WeMx
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 21, 2023
भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात अलीकडेच 3 सामने खेळले गेले आहेत. आशिया कप 2023 मध्ये 2 आणि विश्वचषक 2023 मध्ये 1. भारताने दोन सामने जिंकले होते तर एक सामना पावसामुळे वाहून गेला होता. पण या दोन देशांमधला शेवटचा सामना T20 मध्ये T20 World Cup 2022 मध्ये झाला होता ज्यामध्ये विराट कोहलीने 82 रन्सची नाबाद इनिंग खेळली आणि एकेकाळी पराभवाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भारताला करिष्माई विजय मिळवून दिला.
New York will host the India vs Pakistan match in T20 World Cup 2024. [RevSportz] pic.twitter.com/ncAJWrmxz9
— Johns. (@CricCrazyJohns) December 21, 2023
भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय संबंध (IND vs PAK) चांगले नाहीत. याचा परिणाम क्रिकेटवरही झाला आणि परिणामी 2012 पासून दोन्ही देशांदरम्यान कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळली गेली नाही. भारत आणि पाकिस्तान आता फक्त आशिया चषक किंवा विश्वचषकादरम्यान एकमेकांशी भिडताना दिसतात. दोन देशांमधील द्विपक्षीय संबंध नसल्याबद्दल करोडो क्रिकेट चाहत्यांना खंत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
[ad_2]