[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
IPL 2024, Pat Cummins & Mitchell Starc : आयपीएल 2024 चा लिलाव (IPL Auction 2024) अलिकडे पार पडला असून आता सर्वांना आयपीएलची (IPL 2024) प्रतीक्षा आहे. यंदाच्या आयपीएल लिलावामध्येही (IPL Auction 2024) अनेक खेळाडू मालामाल झाले आहेत. काही खेळाडूंवर तगडी बोली लागली आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू (Australian Cricketer) मिचेल स्टार्क (Mitchell Starc) आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू
मिचेल स्टार्कला 24 कोटींहून अधिक रुपयांची बोली लावून खरेदी केलं आहे. आयपीएलच्या इतिहासातील विक्रमी बोली लावत कोलकाताने मिचेल स्टार्कला आपल्या संघात सामील केलं आहे. पॅट कमिन्स हा आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे खेळाडू आहेत. एकीकडे कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) मिचेल स्टार्कला 24.75 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. तर पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटींना विकत घेतलं आहे. या दोन्ही खेळाडूंच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घ्या.
मिचेल स्टार्कची एकूण संपत्ती
कोलकाता नाईट रायडर्सने मिचेल स्टार्कला आतापर्यंतच्या आयपीएलमधील सर्वाधिक बोली लावत 24.75 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. मिचेल स्टार्कची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. गुजरात टायटन्सने स्टार्कला विकत घेण्याटा आटोकात प्रयत्न केला, पण शेवटी स्टार्कला केकेआरने संघात सामील केलं. या किमतीसह स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. मिचेल स्टार्ककडे (Mitchell Starc Networth) सुमारे 21 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 174 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
1990 मध्ये न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया येथे जन्मलेल्या मिचेल स्टार्कचे वार्षिक उत्पन्न 12,47,06,592 रुपये आहे, तर तो दरमहा सुमारे 1,03,92,216 रुपये कमावतो. त्याची साप्ताहिक कमाई 23,98,203.69 रुपये आणि दैनंदिन उत्पन्न 4,79,640.74 रुपये आहे.
पॅट कमिन्स संपत्तीमध्ये मिशेलच्या पुढे
दुबई येथे इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामासाठी म्हणजे आयपीएल 2024 (IPL 2024) साठीचा खेळाडूंचा लिलाव पार पडला. लिलावाच्या पहिल्या टप्प्यात ऑस्ट्रेलियन खेळाडू पॅट कमिन्स हा आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. मिनी लिलावात सनरायझर्स हैदराबादने पॅट कमिन्सला 20.50 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. कमिन्स आता काव्या मारनच्या नेतृत्वाखालील सनराजर्स हैदराबादकडून खेळताना दिसणार आहे. गेल्या वर्षी, 2022 मध्ये, पॅट कमिन्सला कोलकाता नाइट रायडर्सने 7.25 कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतलं होतं.
दररोज नऊ लाख रुपये कमावतो कमिन्स
पॅट कमिन्स कमाईमध्येदेखील अव्वल आहे. पॅट कमिन्स क्रिकेटसोबतच ब्रँड एंडोर्समेंटद्वारे देखील भरपूर कमाई करतो. मीडिया रिपोर्टनुसार, पॅट कमिन्सची एकूण संपत्ती 40 ते 45 दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे 332-374 कोटी रुपये आहे. त्याचं वार्षिक उत्पन्न सुमारे 24,94,13,184 रुपये आहे. पॅट कमिन्स दर महिन्याला 2,07,84,432 रुपये कमावतात. कमिन्स एका आठवड्यात 47,96,407.37 रुपये कमावतो तर, दर दिवसाला 9,59,281.48 रुपये कमावतात.
कमिन्सच्या एकूण संपत्तीत गेल्या पाच वर्षांत कमालीची वाढ झाली आहे. त्याची संपत्ती दुप्पट झाली आहे. 2018 मध्ये, पॅट कमिन्सची संपत्ती सुमारे 20 दशलक्ष डॉलर्स होती, ती आता 40-45 दशलक्ष डॉलर्सवर पोहोचली आहे. तर मिचेल स्टार्कची संपत्ती अवघ्या चार वर्षांत दुप्पट झाली आहे.
घरे आणि मालमत्ता
एकीकडे मिशेलचे न्यू साउथ वेल्सच्या बौलखाम हिल्स भागात एक आलिशान घर आहे. तर पॅट कमिन्सचं ऑस्ट्रेलियातील वेस्टमीडमध्ये आलिशान घर आहे, ज्याची सुमारे किंमत 20 कोटी रुपये आहे. पॅट कमिन्सकडे आलिशान कार कलेक्शनही आहे, त्याच्याकडे सुमारे 15 कोटी रुपयांच्या कार आहेत. त्यांच्याकडे चार प्रकारच्या लँड रोव्हर कार आहेत. मिशेल स्टार्कच्या कार कलेक्शनमध्येही अनेक लक्झरी कार आहेत, यामध्ये मर्सिडीज आणि आलिशान एसयूव्हीचा समावेश आहे.
[ad_2]