Tips And Tricks In Hindi How To Keep Gmail Account Safe From Hackers Note These Two Things

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Gmail Tips and Tricks : तुम्हीही गुगलची ईमेल सर्व्हिस (Gmail ) जीमेल वापरत असाल तर आज आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत. हॅकर्स लोकांचे अकाऊंट हॅक करण्यासाठी नवनवीन ट्रिक्स शोधत असतात, मग तुम्ही तुमचे जीमेल अकाऊंट हॅकर्सच्या नजरेपासून कसे वाचवू शकता, जाणून घेऊया.

आपल्या जीमेल अकाऊंटला हॅकर्सच्या वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी तुम्हाला दोन महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागतील, पहिलं काम म्हणजे तुम्हाला स्ट्राँग पासवर्डची गरज असेल आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे टू फॅक्टर ऑथेंटिकेशन करुन 

Gmail सुरक्षित ठेवण्याची पहिली  पद्धत

Gmail अकाऊंटला हॅकर्सपासून वाचवण्यासाठी आधी एक मजबूत पासवर्ड तयार करा. मजबूत पासवर्ड तयार करण्यासाठी तुम्ही नंबर, शब्द आणि स्पेशल कॅरेक्टर ्स या तिन्ही गोष्टींचा वापर करता. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे पासवर्ड बनवताना चुकूनही जन्मतारीख, नाव किंवा मोबाईल नंबर वापरू नका.

Gmail सुरक्षित ठेवण्याची दुसरी पद्धत

आपल्या जीमेल अकाऊंटला हॅकर्सच्या नजरेपासून वाचवण्यासाठी टू-फॅक्टर व्हेरिफिकेशन वापरा. जीमेलच्या या सेफ्टी फीचर्समुळे तुमच्या अकाऊंटवर सिक्युरिटीचा आणखी नवा पर्याय आहे. या फीचरमुळे फायदा होईल की फक्त पासवर्ड टाकल्याने तुमचं अकाऊंट उघडणार नाही.

तुमच्या अकाऊंटमध्ये लॉग इन करण्यासाठी तुमच्या डिव्हाइसवर व्हेरिफिकेशनसाठी एक पॉप-अप येतो, कॉम्प्युटर स्क्रीनवर तुम्हाला तीन नंबर दिसतील आणि मोबाइलवरील व्हेरिफिकेशन पॉप-अपमध्ये तुम्हाला तीन नंबर दिसतील, पण एक नंबर असेल जो कॉम्प्युटरस्क्रीनवरही असेल आणि तुमच्या मोबाईलमध्ये दिसणाऱ्या पॉप-अप नोटिफिकेशनमध्येही तुम्हाला दिसेल. या नंबरवर टॅप करताच तुमचं अकाऊंट लॉग इन होईल. टेक्स्ट मेसेज आणि कॉल इत्यादींचा वापर टू-स्पेस व्हेरिफिकेशनसाठी देखील केला जाऊ शकतो.

स्टोरेज वाढवण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा…

 त्यासोबतच जीमेल स्टोरेज मोफत कसे वाढवायचे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. असे दोन मार्ग आहेत.  ज्याच्या मदतीने तुम्ही फक्त 30 सेकंदात 10 एमबी फाइल सिलेक्ट करून स्टोरेज वाढवू शकता.

-सर्वप्रथम तुमचे जीमेल अकाऊंट उघडा.
-यानंतर टॉपमध्ये सर्च ऑप्शनवर जा.
-यानंतर टाईप करून सर्च करा has:attachment larger:10MB
-यानंतर 10MB पेक्षा जास्त स्टोरेज असलेले मेल तुमच्यासमोर येतील.
-तर 10MBपेक्षा जास्त स्टोरेज असलेले  अनावश्यक मेल डिलीट करू शकता.
-यानंतर तुमचे जीमेल स्टोरेज रिकामे होईल. 

इतर महत्वाची बातमी-

Apple Gadgets : Apple Device वर भन्नाट ख्रिसमस ऑफर्स; स्वस्तात मिळतोय Apple MacBook Air, MacBook Pro, iphone 15!

[ad_2]

Related posts