Gmail App Now Gives You An Faster Way To Unsubscribe Emails

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Gmail  Storage : जीमेल अ ॅपमधील प्रमोशनल मेलमुळे स्टोरेज (Gmail  Storage )लवकर भरू लागते. जर तुम्ही ते वेळोवेळी डिलीट केले नाहीत तर गुगल अकाऊंटचे स्टोरेज कमी होऊ लागते आणि ते भरल्यावर नवीन ईमेल मिळत नाहीत. या प्रमोशनल मेल्सपासून सुटका कशी करायची?, असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. आम्ही तुम्हाला यावरचं उत्तर सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही थेटे ते मेल येणं बंद करु शकता नाही तर Unsubscribe करु शकता, चला तर मग पाहुयात…

प्रमोशनल मेल टाळण्यासाठी गुगल जीमेलमध्ये अनसबस्क्राइब बटन देते. सध्या हा पर्याय मेलच्या खाली किंवा थ्री-डॉट मेनूच्या आत उपलब्ध आहे. यामुळे युजर्सना प्रत्येक मेलमधून अनसब्सक्राइब करण्यासाठी अधिक वेळ लागतो. आता नव्या अपडेटमध्ये कंपनीने मेलच्या वरच्या बाजूला आयओएस अॅपमध्ये Unsubscribe बटण दिले आहे. यावर क्लिक करा आणि Unsubscribe करा. यामुळे युजर्स अशा मेलपासून सहज सुटका मिळवू शकतात. सध्या हे अपडेट फक्त आयओएस अॅपसाठी जारी करण्यात आले आहे. अँड्रॉइड युजर्सना ते कधी मिळेल याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

हा पर्याय यापूर्वी देण्यात आला होता 

काही काळापूर्वी गुगलने अँड्रॉइड आणि आयओएस युजर्सना अॅपवर Select All चा पर्याय दिला होता. याच्या मदतीने युजर्स एकाच वेळी 50 मेल सहज डिलीट करू शकतात. यापूर्वी अॅपला एक-एक करून मेल डिलीट करावे लागत होते, ज्यासाठी बराच वेळ लागत असे. ही समस्या दूर करत गुगलने युजर्सना नवा पर्याय दिला आहे. आगामी काळात कंपनी अॅपमध्ये AIला सपोर्ट करणार आहे, ज्यामुळे अनेक कामे पूर्वीपेक्षा सोपी होणार आहेत.

आपण वेबमध्ये Add On पर्याय

जीमेलच्या वेब व्हर्जनमध्ये Add On  फीचरचा वापर करून तुम्ही तुमच्या जीमेल अकाऊंटसोबत AI अॅड करू शकता. कंपनी अनेक अ ॅप्सला सपोर्ट करते जे तुम्ही इन्स्टॉल करू शकता आणि तुमचे काम सोपे करू शकता. जीमेलसाठी जीपीटी, एआय ईमेल रायटर, जीमेलसाठी रिपोर्ट इत्यादी अॅप्स इन्स्टॉल करू शकता.

हेवी फाईल्स कशा डिलीट कराव्यात?

-Gmail वर हेवी फाईल्स शोधण्यासाठी आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरील जीमेल अॅप ओपन करावं लागेल
– त्यानंतर सर्च बारमध्ये जावं लागेल.
– येथे आपल्याला आकार टाइप करावा लागेल. उदा. 5 एमबी किंवा आपल्याला किती एमबी फाईल पहायची आहे. 
– त्यानंतर एंटर दाबताच तुम्हाला जीमेलवर फाईल्स दिसतील
– इथून तुम्ही सर्व मेल सिलेक्ट करून डिलीट करू शकता. यामुळे तुमची बरीच स्टोरेज मोकळी होईल. 
-बिनाकामाचे मेल डिलीट केल्यानंतर आपण ट्रॅश फोल्डर देखील रिकामे करू शकता. 
-डिलीट करण्यात आलेले ट्रॅशमध्ये जमा होतात.
– 30 दिवसांनंतर हे मेल आपोआप डिलीट होतात.
– तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते डिलीटही करू शकता. 

इतर महत्वाची बातमी-

Happy New Year Jio Plan 2024 : Jio ने लाँच केला New Year Plan; दररोज 8 रुपयांत मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट

[ad_2]

Related posts