Maratha Reservation Manjor Jarange Warning Govt On Obc Quota Eknath Shinde Maharashtra News Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

जालना: छत्रपती संभाजीराजेंचा (Sambhajiraje Chhatrapati) मान ठेऊन पाणी घेतलं, यापुढे अन्न आणि पाणी घेणार नाही, राज्य सरकारने मराठा आंदोलनाचा (Maratha Reservation) विषय गांभिर्याने घ्यावा अन्यथा त्यांना झेपणार नाही असा थेट इशारा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी दिला. आम्ही पहिल्यापासूनच ओबीसीमध्ये आहोत, पहिला 50 टक्क्यांच्या आत आरक्षण द्या अशी मागणीही त्यांनी केली. शिंदे-फडणवीस जर दिल्लीला आरक्षणाची चर्चा करायला गेले असतील तर तर त्याचा आनंदच आहे. त्यांनी दिल्लीवरून आरक्षण आणावं असंही जरांगे म्हणाले. 

काय म्हणाले मनोज जरांगे? 

मराठा आरक्षणाच्या विषयावर माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे म्हणाले की, मी सर्वांना ताळ्यावर आणणारआम्हा पहिल्यापासूनच ओबीसा आरक्षणात आहोत. पंजाबराव देशमुखांनी मराठा आणि कुणबी हे एकच असल्याचं सांगितलं होतं. आम्हाला सरकारने 50 टक्क्यांच्या आतच आरक्षण दिलं पाहिजे. 50 टक्क्यांच्या वर आरक्षण दिलं तर ते टिकणार नाही. त्यामुळे पहिला आम्हाला 50 टक्क्यांच्या आत आरक्षण द्यावं आणि मग काय तो कोटा वाढवावा. 

आमची शांतता सरकारला जेरीस आणेल

आमच्या हिंसेवर विश्वास नाही, आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करून आरक्षण मिळवू. आमची शांतता ही सरकारला जेरीस आणेल. आतापर्यंत मराठ्यांनी आत्महत्या केल्या, मराठ्यांनी आता लढायचं ठरवलं आहे. राज्यातल्या कानाकोपऱ्यात आंदोलन सुरू आहे. काहीही झालं तरी आरक्षण मिळवणारच आणि तेही शांततेच्या मार्गाने. 

ही बातमी वाचा: 

[ad_2]

Related posts