never made mistakes while doing tulsi puja know the importance

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Tulsi Pooja Tips: हिंदू धर्मात तुळशी पुजेचा (Tulsi Pooja) विशेष महत्त्व आहे. तुळस ही आरोग्यासाठी बहुगुणी तर आहेच पण त्याचबरोबर पवित्रदेखील आहे. तुळशीचे अनेक फायदे आहेत. घर कितीही मोठं असो वा छोटं प्रत्येक घरात तुळशीचे एक रोप किंवा तुळस वृंदावन असतेच. ज्या घरात तुळशीचे रोप आहे तिथे नेहमी सकारात्मकता राहते. (Tulsi Pooja Importance) देवी लक्ष्मीचा त्या घरात कायम वास असतो. म्हणूनच लोक तुळशीची पूजा करतात. तुळशीची पूजा केल्यास भगवान विष्णुदेखील प्रसन्न होतात. मात्र तुळशीची पूजा करताना काही नियमांचे पालन करणेही गरजेचे आहे. अन्यथा फायद्याच्या जागी नुकसान होऊ शकते. 

तुळशी पुजेचे नियम तुम्हाला माहितीये का?

रोज सकाळी स्नान करुन व स्वच्छ कपडे परिधान करुनच तुळशीला जल अर्पण करावे. असे केल्यास भगवान विष्णु आणि माता लक्ष्मी दोघांची कृपा आपल्यावर राहिल. मात्र, जल अर्पण करताना एक चूक मात्र भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना नाराज करु शकते. रविवारी आणि एकादिवशीला कधीच तुळशीला जल अर्पण करु नये. या दोन दिवशी देवी तुळशी भगवान विष्णुसाठी व्रत ठेवते. त्यामुळं या दिवशी तुळशीला जल अर्पण केल्यास तिचे व्रत तुटू शकते. तसंच, रविवारी आणि एकादशीला तुळशीची पाने तोडू नये तसंच, स्पर्शही करु नये.

नवरा-नवरी अमेरिकेत, भटजीबुवा भारतात, असा पार पडला पुण्याच्या सुप्रियाचा विवाह, फी घेतली तब्बल… 

सूर्य ग्रहण आणि चंद्र ग्रहणाच्या दरम्यान तुळशीच्या पानांना स्पर्श करु नका. तसंच, तुळशीचा पाणीदेखील देऊ नका. यादिवसात तुळशीची पूजादेखील वर्ज आहे. ग्रहणकाळात जेवणात व पाण्यात तुळशीची पाने टाकण्यासाठी ग्रहणाचे वेध सुरू होण्यापूर्वीच तोडून ठेवा. 

स्नान न करता तुळशीच्या रोपाला स्पर्श करु नका तसंच जलदेखील अर्पण करु नका. अस्वच्छ हातांनी, चप्पल-बुटे घालून तुळशीला स्पर्श करु नका

तुळशीची पाने गरज असेल तरच तोडा, विनाकारण तुळशीची पाने तोडून ठेवल्यास घरात दुर्भाग्य येते. 

तुळशीला जल अर्पण करत असताना एका मंत्राचा जाप करावा. ‘महाप्रसाद जननी, सर्व सौभाग्यवर्धिनी। आधि व्याधि हरा नित्यं, तुलसी त्वं नमोस्तुते।। या मंत्राचा सतत जाप केल्यास पुजेचं फळ मिळतं. 

सेंकड हँड कार विकत घेताय, नुकसान होण्याआधी हा अहवाल एकदा वाचाच

तुळशीची पूजा करत असताना महिलांनी केस सुट्टे ठेवू नये. पुजा करताना केस बांधूनच करावी

तुळशीत देवी लक्ष्मीचा वास असतो अशी मान्यता आहे. त्यामुळं तुळशीची पाने तोडताना नेहमी हाथ जोडून नमन करावे व परवानगी घ्यावी

तुळशीची पाने कधीच सुरी, कात्री किंवा नखांसारख्या धारदार शस्त्राने तोडू नका

Related posts