Supreme Court Big Decision On Same Sex Marriage Verdict Live Update SC Judgement Today India Marriage Equality Marathi News Samlaingik Vivah

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Supreme Court on Same Sex Marriage : समलैंगिक विवाह (Same Sex Marriage) प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात ऐतिहासिक निर्णय देत आहे. सर्वोच्च न्यायालयात 10.30 वाजता या प्रकरणावरील निकाल वाचनाला सुरुवात झाली आहे. या प्रकरणामध्ये चार वेगवेगळे निकाल येणार आहेत.

समलैंगिक विवाहाला मान्यता मिळणार?

केवळ शहरी आणि इंग्रजी बोलू शकणाऱ्यांमध्ये समलैंगिक हा मुद्दा आहे असं नाही, असं सरन्यायाधीशांनी म्हटलं होतं. विवाहाच्या नियमात बदल होऊ शकत नाही, असं सुनावणीदरम्यान केंद्र सरकारनं न्यायालयाला सांगितलं होते. यावर सरन्यायाधीशांनी कडक शब्दात म्हटलं होतं की, विवाहाच्या नियमात बदल होऊ शकत नाहीत असं म्हणणं चुकीचं आहे. विशेष विवाह कायद्यामध्या बदल करण्याचा आमच्याकडे अधिकार नाही, असंही केंद्रानं सांगितलं होतं.

सर्वोच्च न्यायालय आज महत्त्वाचा निकाल देणार

समलिंगी विवाहाला कायदेशीर दर्जा देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज निकाल देणार आहे. 11 मे रोजी न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने सुनावणी पूर्ण केली. सुनावणीत याचिकाकर्त्यांनी समलिंगी लग्नाला कायदेशीर मान्यता मिळावी, असा आग्रह धरला होता. तर केंद्र सरकारने समलिंगी जोडप्यांना विवाहाचा दर्जा न देता त्यांना काही अधिकार देण्याचा विचार केला जाऊ शकतो, असं म्हटलं होतं.

पाच न्यायमूर्तींकडून महत्त्वाचा निकाल

पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने समलैंगिक विवाहाला मान्यता देण्याच्या याचिकांवरील सुनावणीनंतर महत्वाचा निर्णय देणार आहेत. या खंडपीठामध्ये सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड (Chief Justice of India DY Chandrachud), न्यायमूर्ती संजय किशन कौल (Justices Sanjay Kishan Kaul), न्यायमूर्ती एस रवींद्र भट्ट (S Ravindra Bhat), न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा (PS Narasimha) आणि न्यायमूर्ती हिमा कोहली (Hima Kohli) यांचा समावेश आहे. 

18 एप्रिलपासून समलैंगिक विवाह प्रकरणाच्या सुनावणीला सुरू झाली. त्यानंतर 20 मे 2023 रोजी या प्रकरणाच्या सर्व याचिकांवरील सुनावणी पूर्ण झाली. सर्वोच्च न्यायालयाने या सुनावणी दरम्यान थेट प्रक्षेपण केलं होतं. त्यानंतर 11 मे रोजी न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने या सुनावणीवरील निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर आज हा निकाल देण्यात येणार आहे.

 

[ad_2]

Related posts