[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
IND vs SA Test : बॉक्सिंग डे कसोटीत आफ्रिकेच्या गोलंदाजीसमोर भारताची फलंदाजी ढेपाळली. कगिसो रबाडाने भेदक मारा करत भारताच्या फलंदाजांना तंबूत धाडले. भारताने 177 धावांत सात विकेट गमावल्या आहेत. आता सर्व मदार केएल राहुल याच्यावर आहे. आफ्रिकेडून कगिसो रबाडा याने पाच विकेट घेतल्या आहेत.
बॉक्सिंग डे कसोटीत आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आफ्रिकेच्या भेदक माऱ्यापुढे टीम इंडियाची सुरुवात अतिशय खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात तंबूत परतला. त्याला कगिसो रबाडा याने बाद केला. शुभमन गिल आणि यशस्वी जायस्वाल यांनाही मोठी खेळी करता आली नाही. शुभमन दिल दोन धावा काढून बाद झाला तर यशस्वी जायस्वाल 17 धावांवर तंबूत परतला. कर्णधार रोहित शर्मा याला फक्त पाच धावा करता आल्या.
24 धावांत भारताचे तीन फलंदाज तंबूत परतले, त्यानंतर अनुभवी विराट कोहलीने श्रेयस अय्यरच्या साथीने भारताच्या डावाला आकार दिला. विराट आणि अय्यर यांनी अर्धशतकी भागिदारी केली. आता ही जोडी मोठी भागिदारी करेल, असा अंदाज वर्तवला जात होता. पण त्याचवेळी रबाडाने श्रेयस अय्यरला क्लीन बोल्ड केले. श्रेयस अय्यरने 50 चेंडूत 31 धावांची खेळी केली. यामध्ये एक षटकार आणि तीन चौकारांचा समावेश आहे.
अय्यर बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि विराट कोहली मैदानात होते. दोघांनाही भागिदारी करण्याचा प्रयत्न केला, पण रबाडाने विराट कोहलीला झेलबाद करत भारताच्या आशेवर पाणी फेरले. विराट कोहलीने 64 चेंडूत 38 धावांची खेळी केली. यामध्ये पाच चौकारांचा समावेश होता. विराट बाद झाल्यानंतर केएल राहुल याने संयमी फलंदाजी सुरु ठेवली. केएल राहुल याने अर्धशतक ठोकलेय.
विराट बाद झाल्यानंतर अश्विनलाही मोठी खेळी करता आली नाही. अश्विन फक्त आठ धावा काढून बाद झाला. राहुल याने शार्दुल ठाकूरच्या साथीने भारताच्या डावाला आकार दे्याचा प्रयत्न केला. दोघांची जोडी जमली होती, पण पुन्हा एकदा रबाडाने ही जोडी फोडली. शार्दूल ठाकूर 24 धावा काढून तंबूत परतला. शार्दूल ठाकूर याने तीन चौकारांच्या मदतीने 24 धावांचं योगदान दिले. सध्या केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह मैदानावर आहेत.
आफ्रिकेकडून कगिसो रबाडा सर्वात धोकादायक ठरला. रबाडाने पाच फलंदाजांना तंबूत पाठवलं. त्यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अश्विन आणि शार्दूल यांचा सावेश आहे. एन बर्गर याला दोन विकेट मिळाल्या.
[ad_2]