[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
New Mobile Launch In 2024 : नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजे जानेवारी 2024 मध्ये बरेच स्मार्टफोन लाँच होणार आहेत. बजेट, मिड, फ्लॅगशिपपासून प्रीमियमपर्यंत प्रत्येक कॅटेगरीमध्ये काही ना काही लाँच होणार आहे. जर तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर 2024 चा पहिला महिना तुमच्यासाठी अनेक पर्याय घेऊन येणार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात 5 स्मार्टफोन लाँच होणार आहेत. चला जाणून घेऊया त्यांच्याविषयी…
पहिल्या आठवड्यात लाँच होणार हे 5 फोन
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात 2 कंपन्या आपली नवीन स्मार्टफोन सीरिज लाँच करणार आहेत. यात रेडमी आणि विवोचा समावेश आहे. रेडमी 4 जानेवारीला रेडमी नोट 13 सीरिज लाँच करणार आहे, ज्याअंतर्गत रेडमी नोट 13, रेडमी नोट 13 प्रो आणि रेडमी नोट 13 प्रो प्लस सह 3 स्मार्टफोन लाँच केले जातील. याच दिवशी विवो विवो एक्स 100 सीरिज लाँच करणार आहे, ज्याअंतर्गत विवो एक्स 100 आणि विवो एक्स 100 प्रो स्मार्टफोन लाँच केले जातील. दोन्ही सीरिजचे काही स्पेक्स लीक झाले आहेत.
रेडमी नोट 13 5जी स्पेसिफिकेशन्स
रिपोर्ट्सनुसार, Redmi Note 13 Pro 5G मध्ये 8 जीबी LPDDR4X रॅम आणि 256 जीबी यूएफएस 2.2 इंटरनल स्टोरेज देण्यात येणार आहे. जे एसएसडी कार्डद्वारे 1 टीबीपर्यंत वाढवता येते. फोनमध्ये 2400 बाय 1080 पिक्सल रिझोल्यूशन आणि 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेला 6.67 इंचाचा अमोलेड डिस्प्ले असेल. याचा टच सॅम्पलिंग रेट 240 हर्ट्झ असेल. हा आगामी स्मार्टफोन मीडियाटेक डायमेंसिटी 6080 एसओसी प्रोसेसरसोबत जोडला जाण्याची शक्यता आहे. यात एमआययूआय 13 वर आधारित अँड्रॉइड 14ऑपरेटिंग सिस्टिम असेल. फोनमध्ये 53 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 5000 एमएएच ची बॅटरी असेल. यात बॅक पॅनेलवर 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स मिळेल. सेल्फी प्रेमींसाठी 16 मेगापिक्सलचा सेन्सर असणार आहे.या फोनला पाणी आणि धुळीला प्रतिरोधक म्हणून आयपी 54 चे रेटिंग देखील देण्यात आले असून कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ 5.2, ड्युअल सिम सपोर्ट, एआय फेस लॉक आणि एनएफसी मिळेल.
Vivo Mobile : Vivo X100 सीरिज स्पेसिफिकेशन्स कोणते?
विवो X100 आणि X100 प्रो मध्ये तुम्हाला 6.78 इंचाचा कर्व-OLED LTPO डिस्प्ले मिळतो, ज्यात 120Hz रिफ्रेश रेट, 2160Hz PWM डिमिंग आणि3000nitsपर्यंत ब्राइटनेस मिळतो. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर या सीरिजमध्ये तुम्हाला मीडियाटेक डायमेंसिटी 9300 चिपसेट मिळतो, ज्यात 116GB LPDDR5x रॅम आणि 512UFS 4.0 स्टोरेज मिळते. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, Vivo X100 मध्ये आपल्याला OIS 50MP Sony IMX920 VCS प्रायमरी कॅमेरा, 50 एमपी सॅमसंग JN1 अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 50MP पेरिस्कोप टेलिफोटो सेन्सर मिळतो. Vivo X100 प्रो मध्ये 50MP 1 इंच Sony IMX989 VCS मेन कॅमेरा, 50 एमपी सॅमसंग जेएन 1 अल्ट्रा-वाइड आणि 64 एमपी रियर कॅमेरा आहे. X100 सीरिजमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी ३32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाले तरX100 मध्ये 120W चार्जिंगसह 5,000mAh ची बॅटरी आहे. X100प्रो मध्ये 1100W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगसह5,400mAh बॅटरी देण्यात आली आहे.
इतर महत्वाची बातमी-
Apple Watches Ban : Apple ला अमेरिकेच्या कोर्टाकडून मोठा धक्का; अमेरिकेत Apple watches वर बंदी; काय आहे नेमकं कारण?
[ad_2]