Ayodhya Ram Mandir : कधी होणार प्राणप्रतिष्ठा? दर्शन कसं घ्यायचं, तिथं कसं पोहोचायचं? सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ram Mandir Inauguration Date and Time : भारतातील एका ठिकाणाची सध्या जगभरात चर्चा सुरु आहे. राजकीय पटल असो किंवा मग पर्यटन विश्व असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये गाजणारं हे ठिकाण आहे अयोध्या. प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शानं पवित्र झालेली भूमी म्हणत अनेकांसाठीच श्रद्धास्थानी असणाऱ्या या अयोध्या नगरीचं वेगळं रुप आता सर्वांसाठी सज्ज झालं असून, लवकरच या नगरीत भाविकांची गर्दी होणार आहे. कारण, बहुप्रतिक्षित अयोध्या राम मंदिरात लवकरच प्राणप्रतिष्ठापनेसाठीचे विधी सुरु होणार आहेत. 

16 जानेवारी 2024 पासून अयोध्येतील राम मंदिरात विधिवत पूजा सुरु होणार असून 22 जानेवारी 2022 मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल. ज्यानंतर भक्तांसाठी मंदिर प्रशासनाच्या वतीनं ‘आरती पास’ ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं उपलब्ध करून दिले जाणार आहेत. प्रभू श्रीरामांची तीन पद्धतींनी आरती होणार असून, भाविकांना त्यांच्या प्राधान्यानं आरतीसाठीचे पास निवडण्याची आणि बुकिंग करण्याची मुभा असेल. तत्पूर्वी तुमच्या मनातील राम मंदिरासंबंधीच्या प्रश्नाची उत्तरं पाहा आणि ही माहिती लक्षात ठेवा… 

कुठं आहे राम मंदिर?

उत्तर प्रदेशातील राम जन्मभूमी, अयोध्या येथे राम मंदिर उभारण्यात आलं आहे. 

कधी आहे मंदिरातील मुख्य प्राण प्रतिष्ठा सोहळा? 

24 जानेवारी 2024 रोजी राम लल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून पूजेसाठीचा वेळ अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. 

राम मंदिरापर्यंत कसं पोहोचायचं? (How to reach Ayodhya)

अयोध्येपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ज्यामुळं इथं भाविक आणि पर्यटक सहजपणे पोहोचू शकतात. 

  • विमान प्रवास- मुख्य शहरापासून 6 किमी अंतरावर असणाऱ्या अयोध्या विमानतळावरून तुम्ही अयोध्या गाठू शकता. 
  • रेल्वे प्रवास- अयोध्या जंक्शन रेल्वे स्थानकावर उतरून तुम्ही राम मंदिरापर्यंत येऊ शकता. तुमच्या शहरातून या रेल्वे स्थानकाशी अनेर ट्रेन जोडल्या गेल्या आहेत. 
  • रस्ते मार्ग – राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांच्या मदतीनं देशातील अनेक राज्यांतून अयोध्या गाठता येऊ शकते. 

कसा बुक कराला आरतीसाठीचा पास? 

  • राम मंदिरातील Aarti pass घेण्यासाठी सर्वप्रथम मंदिर प्रशासनाच्या srjbtkshetra.org या संकेतस्थळाला भेट द्या. 
  • आता OTP वापरून लॉगईन करा. 
  • होमपेजवर ‘Aarti’ या पर्यायावर क्लिक करा. 
  • आता तिथे तुमच्या सोयीनुसार तारीख आणि आरतीचा प्रकार निवडा 
  • विचारण्यात आलेल्या माहितीची पूर्तता करा 
  • नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आणि ईमेल अशी माहिती दिल्यानंतर पास जनरेट होईल. 
  • मंदिरात भेट देण्याच्या वेळी तुम्ही तिकीट खिडकीवरून पास मिळवून आरतीसाठी गाभाऱ्यात जाऊ शकता. 

 

येत्या काळात राम मंदिर आणि अयोध्येमध्ये येणाऱ्या पर्यटकांचा आकडा पाहता सध्या उत्तर प्रदेश राज्य शासन आणि श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाच्या वतीनं सर्व गोष्टींची काळजी घेतली जात असून, भविष्याच्या दृष्टीनंही महत्त्वाची आखणी केली जात आहे. 

Related posts