[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
ASUS ROG Phone 8 : 2024 हे वर्ष नवनवीन मोबाईल सीरीजमध्ये इंट्रेस्ट असणाऱ्या लोकांसाठी महत्वाचं ठरणार आहे, कारण या वर्षात अनेक वेगवेगळे मोबाईल ब्रॅण्ड्स आपले स्मार्टफोन लाँच करणार आहे. यातच ASUS ही मोबाईल बनवणारी कंपनी आपली ASUS ROG Phone 8 ही सीरीज येत्या काही दिवसात लाँच करणार आहे. या सिरीजमध्ये आधीच्या फिचर्ससह नवीन फिचर्सही आपल्याला पाहायला मिळणार आहे. येत्या 16 जानेवारीत चीनमध्ये लाँच होणार आहे. मात्र भारतात हा फोन कधी लाँच होणार आहे, यासंदर्भातील अजून कोणतीही माहिती देण्यात आली नाही आहे.
नवे फिचर्स कसे असतील?
ASUS ROG Phone 8 या सिरीजमध्ये आपल्याला स्नॅपड्रॅगन 8 JN 3 चिप मिळणार आहे. यासोबतच सर्व तीन मॉडेलोंसाठी ही चिप समान असणार आहे, ज्यात अल्टीमेट मॉडेल चिपसेट क्लॉक स्पीड जास्त असणार आहे.हा स्मार्टफोन आपल्याला 24GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेजसह आपल्याला मिळणार आहे. यात सॉफ्टवेयरचा विचारकरता ROJ फोन 8 सीरीज अँड्रॉइड 14 OS असल्याने हा स्मार्टफोन चांगल्या प्रकारे काम करु शकतो. याचबरोबर 65W चा फास्ट चार्जिंग सपोर्टसह देखील येणार आहे.
लूकपण असणार भन्नाट
ASUS ROG Phone 8 या स्मार्टफोनच्या लूकचीसुद्धा जबरदस्त चर्चा पाहायला मिळत आहे. यात आपल्या एका वेगळ्या लुकमध्ये बॅकपॅनल पाहायला मिळणार आहे. यात डिजाइन केलेले ट्रिपल कॅमेरा सेटअप मॉड्यूल मिळणार आहे. ROG Phone 8 हा स्मार्टफोन ग्रे- व्हाईट अशा हटके कलर कॉम्बिनेशनमध्ये मिळणार आहे, यामुळे या सिरिजचा हा भन्नाट लूक प्रचंड चर्चेत आहे.
गेमिंगप्रेमींसाठी चांगला पर्याय
मोबाईल गेमिंगमध्ये इंट्रेस असणाऱ्या लोकांसाठी ASUS ROG Phone 8 ही सिरींज म्हणजे एक पर्वणीच असणार आहे, यात आपल्याला स्नॅपड्रॅगन 8 JN 3 चिपसेट मिळणार आहे. याव्दारे आपल्याला गॅमेंगमध्ये अधिकचा स्पीड मिळणार आहे.
16 जानेवारीला होणार लाँच
ASUS ROG Phone 8 series ची लाँच डेट 16 जानेवारी असून यादिवशी तो फक्त चीनमध्ये लाँच होणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आलेली आहे, मात्र ही सिरीज ग्लोबली कधी लाँच होणार याची कोणतीही माहिती कंपनीकडून देण्यात आलेली नाही, पण त्यानंतर काही दिवसात भारतसह अन्य बाजारांमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता असली तरीही यासाठी आपल्याला थोड्या दिवसाची प्रतीक्षा मात्र करावी लागणार आहे.
इतर महत्वाची बातमी-
Apple : आनंदवार्ता! आतापर्यंतच्या सगळ्यात कमी किंमतीत मिळणार iPhone 15 आणि MacBook , सुरु होणार Apple Days Sale
[ad_2]