IND Vs SA 2nd Test Mohammad Siraj Powerful Spell Outscored Srinath And Ishant Sharma A New Record In Tests

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mohammed Siraj Record : केपटाऊन कसोटीत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने भेदक गोलंदाजी केली. मोहम्मद सिराजने 9 षटकात 15 धावा देत 6 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. सिराजने पहिल्याच सत्रात 5 बळी घेत इतिहास रचला. याशिवाय आणखी अनेक विक्रम आपल्या नावावर केले. जसप्रीत बुमराहने भारताकडून कसोटी सामन्यात सर्वात कमी धावा देत 5 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. जसप्रीत बुमराहने 2019 साली वेस्ट इंडिजविरुद्ध 7 धावांत 5 फलंदाज बाद केले होते.

मोहम्मद सिराजने विशेष यादीत स्थान मिळवले

मोहम्मद सिराज या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. केपटाऊनमध्ये सिराजने 15 धावांत 6 खेळाडू बाद केले. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्यानंतर भारताचा माजी दिग्गज जवागल श्रीनाथ तिसऱ्या क्रमांकावर आहे. जवागल श्रीनाथ यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 21 धावांत 6 बळी घेतले. हा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 1996 साली खेळला गेला होता.

या दिग्गजांचा यादीत समावेश

बांगलादेशविरुद्ध इशांत शर्माने 22 धावांत 5 बळी घेतले. भारत आणि बांगलादेश यांच्यातील हा सामना 2019 मध्ये कोलकाता येथे झाला होता. याशिवाय मदन लाल यांनी 1981 साली इंग्लंडविरुद्ध 23 धावांत 5 विकेट घेतल्या  होत्या. भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा सामना 1981 मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला होता. त्याचवेळी केपटाऊनमध्ये मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या 55 ​​धावांवर गारद झाला. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 6 बळी घेतले. याशिवाय जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांना प्रत्येकी 2 यश मिळाले.

इतर महत्वाच्या बातम्या 



[ad_2]

Related posts