[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
IND vs RSA 2nd Test : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा अवघ्या दीड दिवसात धुव्वा उडवत मालिका 1-1 बरोबरीत सोडवली आहे. केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने 7 गडी राखून विजय मिळवला. भारताच्या या विजयात मोहम्मद सिराज (Mohhammad Siraj) आणि जसप्रीत बुमराहचे (Jasprit Bumrah) महत्त्वाचे योगदान राहिले. टीम इंडियाने या विजयासह नवा इतिहास रचला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये केपटाऊनच्या मैदानावर पहिल्यांदाच कसोटी सामना जिंकण्याचा पराक्रम भारतीय संघाने केला आहे.
केपटाऊनमध्ये यापूर्वी भारताने 6 कसोटी सामने खेळले होते. त्यातील 4 सामन्यांत टीम इंडिया पराभूत झाली होती. दरम्यान, 3 तारखेपासून केपटाऊनमध्ये टीम इंडियाने 7 वा सामना खेळण्यास सुरुवात केली आणि इतिहास रचला. भारताचा हा कसोटीत केपटाऊनच्या मैदानातील पहिला विजय आहे.
1993 मध्ये खेळला होता केपटाऊनच्या मैदानावर पहिला कसोटी सामना
भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs RSA) केपटाऊनच्या मैदानावर 1993 मध्ये पहिला कसोटी सामना खेळला होता. हा सामना अर्निणयीत राहिला होता. यानंतर 1997 मध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताला 282 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. शिवाय, 2007 मध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यातही दक्षिण आफ्रिकेने 5 गडी राखून विजय मिळवला होता. तर 2011 मध्ये खेळवण्यात आलेला सामना अनिर्णयीत राहिला होता. यानंतर 2018 आणि 2022 मध्ये झालेल्या सामन्यांमध्ये टीम इंडिया पराभूत झाली होती. आता पुन्हा एकदा केपटाऊनच्या मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका आमने-सामने आले होते. या सामन्यात भारताने मोठा विजय मिळवला आहे.
India emerge victorious within five sessions of play in the Cape Town Test to level the #SAvIND series 👊#WTC25 | 📝: https://t.co/eiCgIxfJNY pic.twitter.com/XpqaIEBeGk
— ICC (@ICC) January 4, 2024
सामन्यातील टीम इंडियाची कामगिरी
भारताच्या या विजयात मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहचे महत्त्वाचे योगदान राहिले. सिराजने पहिल्या डावात 6 बळी घेतले, तर बुमराहने दुसऱ्या डावात 6 फलंदाजांना माघारी धाडले. पहिल्या डावात 98 धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाला दुसऱ्या डावात 176 धावा करता आल्या. अशाप्रकारे भारताला विजयासाठी 79 धावांचे लक्ष्य मिळाले, जे टीम इंडियाने तीन गडी गमावून सहज गाठले.
दुसऱ्याच दिवशी भारताने दुसरी कसोटी जिंकली. यासह दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात केवळ 55 धावा करू शकला. यानंतर टीम इंडियाने पहिल्या डावात 153 धावा केल्या आणि 98 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली. यानंतर दुसऱ्या डावात अॅडम मार्करमच्या शतकाच्या जोरावर यजमान संघाने 176 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने दुसरी कसोटी तीन विकेट्स गमावून जिंकली.
इतर महत्वाच्या बातम्या
IND vs SA 2nd Test : 76 च्या बदल्यात 55! टीम इंडियानं तब्बल 16 वर्षांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बदला घेतला; सर्वात लाजिरवाण्या विक्रमाची सुद्धा नोंद
[ad_2]