India Squad For Afghanistan T20 Series King Virat Kohli And Regular Skipper Rohit Sharma Have Declared Themselves Available For The T20 Format

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

India Squad For Afghanistan T20 Series : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आज (5 जानेवारी) अफगाणिस्तानविरुद्धच्या T20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करू शकते. ही मालिका 11 जानेवारीपासून सुरू होणार आहे. वृत्तानुसार, या मालिकेमुळे रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे T-20 संघात पुनरागमन होणार आहे.अफगाणिस्तानचा संघ तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेतील पहिला टी-20 सामना 11 जानेवारीला मोहालीत खेळवला जाणार आहे. दुसरा T-20 इंदूरमध्ये 14 जानेवारीला आणि तिसरा आणि शेवटचा T-20 17 जानेवारीला बंगळूरमध्ये खेळवला जाईल.

रोहित आणि कोहली उपलब्ध

किंग विराट कोहली आणि नियमित कर्णधार रोहित शर्मा यांनी स्वतःला T20 फॉरमॅटसाठी उपलब्ध घोषित केले आहे. रिपोर्टनुसार, कोहली आणि रोहितने टी-20 वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत सिराज आणि बुमराहला विश्रांती मिळेल

अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना विश्रांती देण्यात येईल, असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. तर मोहम्मद शमी देखील या मालिकेत टीम इंडियाचा भाग असणार नाही.

सूर्यकुमार आणि हार्दिक पांड्या देखील संघाचा भाग नसतील

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची कमान सांभाळणारे सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या दुखापतींमुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाचा भाग असणार नाहीत.

या युवा खेळाडूंना स्थान मिळू शकते

इशान किशन, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, जितेश शर्मा, मुकेश कुमार, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि वॉशिंग्टन सुंदर या खेळाडूंना अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत स्थान मिळू शकते. मात्र, काही खेळाडूंच्या दुखापतीमुळे काही नवे चेहरेही संघात सामील होऊ शकतात. मात्र, विराट कोहली आणि रोहित शर्मा टी-20 संघात पुनरागमन करतात की नाही हे पाहणे औत्सुक्याचं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 



[ad_2]

Related posts