K L Rahul’s Asia Cup 2023 Fate Will Be Decided On September 4 ; आशिया कपमध्ये खेळायला राहुल श्रीलंकेत कधी जाऊ शकतो, जाणून घ्या काय असेल तारीख

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : लोकेश राहुल हा फिट नसतानाही त्याला आशिया चषक स्पर्धेसाठी निवडण्यात आले होते. पण तो फिचट नसल्याचे समोर आले. त्यामुळे भारतीय संघ आशिया चषक खेळण्यासाठी श्रीलंकेत दाखल झाला तरी राहुल हा बंगळुरुमध्येच होता. पण आता भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी लवकरच येऊ शकते. कारण आता राहुल आशिया चषक खेळण्यासाठी श्रीलंकेत जाणार असल्याचे समजते आहे.

फिट नसताना जेव्हा राहुलला भारतीय संघात निवडले होते, तेव्हा निवड समितीवर जोरदार टीका झाली होती. कारण फिट नसताना त्याची संघात निवड कशी केली, हा मोठा प३श्न निवड समितीला विचारण्यात आला होता. पण राहुलची दुखापत गंभीर नसल्याचे निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी सांगितले होते. पण जेव्हा भारतीय संघ श्रीलंकेत आशिया चषक खेळण्यासाठी जाण्याच्या तयारीत होता. तेव्हा संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी लोकेश राहुल हा फिट नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे भारतीय निवड समितीवर नामुष्कीची वेळ ओढवली होती. पण आता राहुल आशिया चषक स्पर्धा खेळण्यासाठी श्रीलंकेत जाऊ शकतो, असे संकेत मिळाले आहेत.

लोकेश राहुल वगळता भारतीय संघातील उर्वरित सर्व खेळाडू श्रीलंकेत दाखल झाले आहेत. राहुल हा बेंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव सामने खेळणार आहे. त्या वेळी त्याच्या तंदुरुस्तीचा अभ्यास तज्ज्ञांकडून केला जाणार आहे. राहुलच्या तंदुरुस्तीचा आढावा ४ सप्टेंबरला घेण्यात येईल आणि त्यानंतर त्याच्या आशिया कप स्पर्धेच्या अंतिम टप्प्यातील सहभागाबाबत निर्णय होईल, असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे राहुल जर या फिटनेस टेस्टमध्ये पास ठरला तर तो ५ सप्टेंबरला आशिया चषक खेळण्यासाछी श्रीलंकेला प्रयाण करू शकतो. त्यामुळे आता फिटनेस टेस्टमध्ये नेमकं काय होतं, यावर राहुल या स्पर्धेत खेळणार की नाही हे ठरणार आहे.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

श्रेयस अय्यरच्या तंदुरुस्तीबाबत कोणताही प्रश्न नाही. तो आशिया कप स्पर्धेतील पहिल्या सामन्यापासून संघनिवडीसाठी उपलब्ध आहे. त्याची शनिवारच्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी निवड जवळपास निश्चित आहे.

[ad_2]

Related posts