Chandrayaan 3 Update ISRO Shared Pragyan Rover Video Shoot by Vikram Lander; प्रज्ञान रोवरचा व्हिडिओ विक्रम लँडरनं टिपला, चंदामामा म्हणत इस्त्रोचं भन्नाट कॅप्शन

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बंगळुरु : चांद्रयान ३ ही भारताची मोहीम यशस्वी ठरलीय. भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवून इतिहास रचला. २३ ऑगस्ट २०२३ पासून विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवरकडून चंद्राच्या भूभागाचा अभ्यास करण्याचं काम सुरु आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर लावण्यात आलेल्या उपकरणांद्वारे चंदाचा अभ्यास करण्यात येत आहे. इस्त्रोनं काल प्रज्ञान रोवरवरील नॅसकॅमनं विक्रम लँडरचे टिपलेले फोटो शेअर केले होते. आज दुपारी इस्त्रोकडून विक्रम लँडरद्वारे प्रज्ञान रोवरचा चित्रित करण्यात आलेला व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

प्रज्ञान रोवरचा व्हिडिओ आणि इस्त्रोचं भन्नाट कॅप्शन

प्रज्ञान रोवर सुरक्षित मार्गाचा शोध घेत असताना चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मार्ग बदलत असल्याचं इस्रोनं शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटलं आहे. रोवरचं रोटेशन विक्रम लँडरनं टिपला आहे. इस्त्रोनं हा व्हिडिओ शेअर करताना एक भन्नाट कॅप्शन दिलं आहे. चंदामामाच्या अंगणात एखादं लहान मुल खेळतंय आणि त्याची आई निरखून पाहतेय, असं भन्नाट कॅप्शन इस्त्रोनं दिलं आहे.

दोन युद्ध लढले, वय वर्ष ९१; आर्थिक स्थितीही उत्तम, तरीही आजोबांनी बायको, लेकीला का संपवले?

विक्रम लँडरच्या चंद्रावरील फोटोमुळं भारताच्या यशावर शिक्कामोर्तब

भारतीय अवकाश संशोधन सस्था म्हणजेच इस्त्रोनं काल प्रज्ञान रोवरनं विक्रम लँडरचे टिपलेले फोटो शेअर केले होते. आज इस्त्रोनं प्रज्ञान रोवरचा एक व्हिडिओ शेअर केला. त्यामध्ये प्रज्ञान रोवर चंद्राच्या भूभागावर सुरक्षित मार्ग शोधत असल्याचं दिसून आलं. इस्त्रोनं फोटो आणि व्हिडिओ शेअर केल्यानं भारतानं चांद्रयान ३ मोहिमेत यश मिळवलं आहे याचे आता वेगळे पुरावे देण्याची गरज नाही.

पैसे नसतील तर सांग, गणपतीसमोर दानपेटी ठेवतो आणि तुला देतो, बच्चू कडू सचिनविरोधात आक्रमक
चांद्रयान ३ नं आतापर्यंत चंद्राच्या भूभागावर संशोधन करत अनेक शोध लावले आहेत. चंद्रावर ऑक्सिजन, सल्फर, लोह, सिलिकॉन, अॅल्युमिनिअम आढळलं आहे. चांद्रयान ३ च्या प्रज्ञान रोवरवरील पेलोड अल्फा पार्टिकल एक्स रे स्पेक्ट्रोस्कोपनं चंद्राच्या भूभागावर गंधक असल्याचा शोध लावला आहे. इस्त्रोकडून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर हायड्रोजनचा शोध सुरु आहे.

चांद्रयान ३ मोहीम यशस्वी ठरल्यानंतर इस्त्रो आता सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल १ मिशन हाती घेणार आहे. आदित्य एल १ चं प्रक्षेपण २ सप्टेंबरला होणार आहे.
जिल्ह्यात सर्व आमदार सत्तेत, खासदारांना निधी द्यायचा कसा, दादा भुसे चिंतेत, नेमकं प्रकरण काय?



[ad_2]

Related posts