Chief Minister Eknath Shinde and Manoj Jarange received a grand reception at Chhatrapati Shivaji Maharaj Chowk in Vashi navi mumbai

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

वाशी (नवी मुंबई) : मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे 13 मागण्या करत निर्णायक इशारा दिला होता. जर आज (27 जानेवारी) दुपारी बारापर्यंत मराठ्यांच्या मागण्यांवर विचार नाही झाला, तर थेट आझाद मैदानात जाऊन उपोषण करण्याचा इशारा दिला होता. या सर्व पार्श्वभूमीवर शिंदे सरकारने तातडीने पावले उचलत मध्यरात्रीच मनोज जरांगे पाटील यांनी केलेला मागण्या मान्य करत जीआर सुद्धा जारी केला. 

दरम्यान, आज (27 जानेवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, दीपक केसरकर आणि शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाठ यांच्यासह वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचले. या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी क्रेनमध्ये चढून त्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेत मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय माघार घेणार नाही, अशी शपथ घेतली होती. त्यामुळे आज एक प्रकारे अध्यादेश काढत सरकारने आपला शब्द पूर्ण केल्याचे बोलले जात आहे. 

या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे सभेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे या सभेमध्ये मनोज जरांगे  पाटील उपोषण सोडतील. दरम्यान मनोज जरांगे उपोष सोडतानाच आंदोलन स्थगित करण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. दुसरीकडे त्यांनी सरकारने अध्यादेश जो जारी केला आहे, त्यामध्ये काही अडचणी आल्यास पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरण्याचा इशारा दिला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts