Moto G34 5g Price In India Rs 10999 128gb Launched With 50mp Camera 5000mah Battery Sale Date 17th January Flipkart

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Moto G34 5G :  मोटोरोलाने  भारतात Moto G34 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. हा कंपनीचा लेटेस्ट बजेट  5G स्मार्टफोन आहे. 2024 मध्ये लाँच झालेला हा पहिला मोटो फोन आहे. Moto G34 5G मध्ये 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट डिस्प्ले, 8 GB रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. कंपनीने या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर बसवला आहे. मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, ज्याचा मुख्य सेन्सर 50 मेगापिक्सलचा आहे. Moto G34 5G मध्ये 5000 एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. 

भारतात Moto G34 5G किंमत, उपलब्धता

भारतात Moto G34 5G  च्या 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत 10,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे.  8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज च्या टॉप-एंड मॉडेलची किंमत 11,999 रुपये आहे. विशेष म्हणजे कंपनी या फोनवर 1,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देत आहे, त्यानंतर फोनची किंमत अनुक्रमे 9,999 रुपये आणि 10,999 रुपये करण्यात आली आहे. हे डिव्हाइस चारकोल ब्लॅक, आइस ब्लू आणि ओशन ग्रीन कलरमध्ये उपलब्ध आहे. Moto G34 5G ची विक्री 17 जानेवारीपासून फ्लिपकार्ट आणि काही रिटेल स्टोअर्सवर सुरू होणार आहे. 

Moto G34 5G  स्पेसिफिकेशन्स

ड्युअल सिम (नॅनो) स्लॉटसह येणारा मोटो जी३४ ५जी स्मार्टफोन अँड्रॉइड 14  OS चालतो. अँड्रॉइड 15 मध्ये अपग्रेड करण्याव्यतिरिक्त कंपनी 3 वर्षांच्या सिक्युरिटी पॅचेसबद्दलही बोलत आहे. फोनमध्ये 6.5  इंचाचा HD (720×1,600 पिक्सल)LCD डिस्प्ले आहे. डिस्प्लेमध्ये 120 हर्ट्झचा अॅडेप्टिव्ह रिफ्रेश रेट, 20:9 आस्पेक्ट रेशो आणि 240 हर्ट्झचा टच सॅम्पलिंग रेट आहे. डिस्प्लेमध्ये पंच होल असून पांडा ग्लासचे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये 8 जीबी रॅम आणि स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर देण्यात आला आहे. मोटोचे म्हणणे आहे की, फोनच्या फ्री स्टोरेजच्या आधारे मेमरी 16  जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. Moto G34 5G  मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात मुख्य सेन्सर 50 मेगापिक्सलचा आहे. यासोबत 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. याची 128 जीबी इंटरनल स्टोरेज एसडी कार्डद्वारे 1 टीबीपर्यंत घेता येऊ शकते Moto G34 5G  मध्ये 5000 एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. हे 20 वॉट टर्बो पॉवर चार्जिंगला सपोर्ट करते. चार्जर बॉक्समध्येच येतो. डिव्हाइसचे वजन 179 ग्रॅम आहे. 

इतर महत्वाची बातमी-

WhatsApp Security Tips : ‘या’ तीन प्रकारे सुरक्षित करा तुमचं Whatsapp अकाऊंट, नाहीतर पर्सनल डेटा गेलाच म्हणून समजा! 

 

 

 

[ad_2]

Related posts