Poco X6 And X6 Pro Launching Today At 5 30pm Expected Price Livestream Specs And Hyperos In Pro Model

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Poco X6 Series : चीनचा स्मार्टफोन ब्रँड पोको आज (Poco) संध्याकाळी 5.30 वाजता भारतात पोको एक्स 6 सीरिज लाँच करणार आहे. या सीरिजअंतर्गत Poco X6 आणि PocoX6 Pro सह 2 स्मार्टफोन लाँच केले जातील. लाँचिंगपूर्वीच दोन्ही मोबाइल फोनचे स्पेक्स लीक झाले आहेत. काही टिप्सटरनी तर मोबाइल फोनची किंमत शेअर केली आहे. हा लाँच इव्हेंट तुम्ही कंपनीच्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून पाहू शकाल. हा फोन बिग ब़ॉसमध्ये दाखवण्यात आला होता. त्यानंतर आता भारतात लॉंच होणार आहे. या फोनचे फिचर्स जाणून घेऊया.

HypherOS चे फिचर्स 

शाओमीच्या या  HypherOS ला कंपनीने विशेष पद्धतीने डिझाईन केलं आहे. या कारणाने मोबाईल फोनचा परफॉर्मन्स फास्ट होऊ शकतो. ही ऑपरेटिंग सिस्टिम शाओमीच्या Vela सिस्टीमसारखे काम करते. तसेच, चॅलेंजिंग स्थितीत या स्मार्टफोनला फास्ट काम करण्यासाठी मदत करते. याव्यतिरिक्त यामध्ये AI इंटीग्रेशन, क्रॉस डिवाइस कनेक्टिविटी, प्रायव्हसी अँड सेक्युरिटी, असे अनेक फिचर्स तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही फोटोला टेक्स्टमधून एक्सट्रेक्ट, डूडलला इमेजमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठीदेखील काम करते. 

Poco X6 Pro ची स्पेसिफिकेशन

या फोनमध्ये तुम्हाला 6.67 इंच 1.5k LTPS स्क्रीन 120hz चा रिफ्रेश रेट यासोबतच MediaTek Dimensity 8300 Ultra processor, 64+8+2 MP चे तीन कॅमेरा, आणि 67 वॉटची फार चार्जिंग यात मिळणार आहे. स्मार्टफोनची किंमत 25,000 ते 30,000 रुपयांच्या आसपास असू शकते. पण ही किंमत काही लिक्सवरून आधारित आहे. स्टोरेज व्हेरिएंटच्या हिशोबाने ती कमी जास्त होऊ शकते. 

गॅलेक्सी S24 सिरीज लाँच

पोकोनंतर सॅमसंग (Samsung) आपली गॅलेक्सी S24 (Galaxy S24) ही सिरीज लाँच करणार आहे. यात तीन स्मार्टफोन लाँच होणार आहेत. सध्या या सिरीजसाठी प्री-बुकिंग सुरू झालेली आहे. जर तुम्ही सॅमसंग गॅलेक्सी एस 24 सीरिजचे प्री-बुकिंग केले तर, कंपनी तुम्हाला 5,000 रुपयांचा अतिरिक्त फायदा देईल. तसेच जुना फोन एक्सचेंज केल्यावर तुम्हाला बेस्ट व्हॅल्यू आणि स्पेशल एडिशन फोन आणि सॅमसंग क्लब मेंबर होण्याची संधी मिळेल, ज्यामध्ये कंपनी वेलकम वॉचर कंपनीला 5,000 रुपयांपर्यंत देऊ शकते. मोबाइल फोनचे प्री-बुकिंग करण्यासाठी आता 1,999 रुपये मोजावे लागतील, जे रिफंडेबल आहे. डिव्हाइस बुक करण्यासाठी तुम्हाला सॅमसंगच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

इतर महत्वाची बातमी-

Realme 12 Series Pro : Realme 12 Series लॉंच डेट ठरली, 200MP कॅमेरा ते पेरिस्कोप लेन्सपर्यंत संपूर्ण माहिती एका क्लिकवर!

[ad_2]

Related posts