Whatsapp Strickers Now Convert Your Favorite Photo To WhatsApp Stickers Find Out An Easy Trick

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Whatsapp strickers : व्हॉट्सॲपस्टिकर्स मध्ये  रोज रोज तेच (Whatsapp)  स्टिकर्स वापरून तुम्हाला देखील कंटाळा आला असेल. मात्र आता ते दिवस संपले आता तुम्हाला त्याच स्टिकर्सवर अवलंबून राहण्याची काहीही गरज उरली नाही. iOS यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आली आहे. व्हॉट्सॲप  एक पावरफुल कॉस्टम स्टिकर मेकर घेऊन येत आहे. साध्या पद्धतीने व्हॉट्सॲपवर मेसेजमध्ये बोलणं हे कंटाळवाणं आहे त्यामुळे एक भन्नाट आयडिया आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही तुमच्या चित्रविचित्र भावना किंवा जोक, शुभेच्छा तुमच्या गॅलरीमधील फोटोला स्टिकर्समध्ये कन्व्हर्ट करून व्हॉट्सॲपवर शेअर करू शकता. 

एका मिनिटात फोटोपासून बनवा स्टिकर्स

एखादी इमेज ड्रॅग करण्याचे दिवस आता संपलेत. आता तुम्ही तुमच्या आत मधील कलाकाराला बाहेर काढू शकतात. व्हॉट्सॲप मध्ये हे नवीन स्टिकर्स कसे तयार करायचे हे आपण आता पाहूया. 

-‌सगळ्यात अगोदर स्टिकर ट्रे उघडा आणि स्टिकर तयार करा. 
-‌आता तुमच्या गॅलरीमधून कोणताही एखादा फोटो तुम्ही निवडा मग तुमची सेल्फी असेल एखादा पाळीव -प्राणी असेल किंवा तुमचा मित्र असेल. 
-‌आता स्वतःचं डोकं वापरुन वेगवेगळ्या पद्धतीने हे स्टिकर तयार करा. 
-‌त्या इमेजचा कटआऊट टुल वापरून एक परफेक्ट पोर्शन सगळ्यात पहिल्यांदा कट करा. 
-‌आता त्या फोटोमध्ये वेगवेगळे टेक्स, इमोजी वापरा. 
‌-लेअर ऑन दि फंड झाल्यानंतर तुमचा फोटो एका स्टिकर मध्ये कन्व्हर्ट झालेला तुम्हाला दिसेल. 

परत एडिट करु शकता स्टिकर

तुमच्याकडून हा स्टिकर बनवताना काहीतरी गडबड झाली का? अजिबात घाबरू नका तुम्हाला तो स्टिकर पुन्हा तयार करण्याची गरज नाही. कारण एखादा नवीन स्टिकर असेल किंवा तुम्ही अगोदर तयार केलेला स्टीकर असेल तो तुम्ही अगदी सहजरीत्या परत एडिट करू शकता. फक्त त्या स्टिकरवर एक लॉंग प्रेस करा आणि तेथे एडीट स्टिकर म्हणून ऑप्शन येईल त्याच्यावर क्लिक करून तो स्टिकर एडिट करा. 

ही स्टिकर बनवायचं फिचर आता सध्या iOS 17 युजर्ससाठीच उपलब्ध आहे.पण तुम्ही नाराज होऊ नका, तुम्ही स्वतः जरी स्टीकर असे बनवत नसला तरी तुमच्या मित्रांकडून असे स्टिकर्स बनवून घ्या. एक दुसऱ्यांना शेअर करा आणि यातली मज्जा घ्या आणि हो याव्यतिरिक्त तुम्ही AI जनरेटेड स्टिकर्ससुद्धा वापरु शकतात. 

इतर महत्वाची बातमी-

Instagram Scam : Instagram वरील ‘या’ लिंकवर क्लिक केलं तर खिसा होईल रिकामा; फसवणुकीसाठी सायबर भामट्यांचा नवा फंडा!

[ad_2]

Related posts