[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Free Netflix : तुम्हाला जर लेटेस्ट मुव्हीज आणि वेब सिरीज ( Netflix ) यासाठी ओटीटी स्ट्रिमिंग बघण्याची इच्छा आहे का? भरपूर लोक लेटेस्ट मूवी आणि वेब सिरीज साठी नेटफ्लिक्सला पसंती देतात मात्र प्रत्येकवेळी तुमच्यासाठी नेटफ्लेक्स सबस्क्रीप्शन घेणं महागात पडतं. आता तुम्ही या सबस्क्रिप्शनचे पैसे वाचवू शकतात. यासाठीच तुम्हाला एक कमाल ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही लेटेस्ट सिरीज किंवा मुव्हीज बघू शकतात.
सध्याच्या जगात चालू असलेल्या स्पर्धेमध्ये एकमेकांपेक्षा पुढे जायच्या इच्छेने टेलिकॉम कंपनी नवनवीन फिचर्स ग्राहकांना देत असते. याच कारणामुळे जिओ आणि एअरटेल आपल्या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्सच्या फ्री सब्सक्रिप्शनची ऑफर देत आहे. आज आम्ही तुम्हाला देशातील सगळ्यात नंबर वन टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ याच्या दोन सबस्क्रिप्शन प्लॅन बद्दलची माहिती देणार आहोत. ज्यामुळे तुम्ही नेटफ्लिक्स फ्रीमध्ये बघू शकता.
जिओच्या या प्लॅनची सगळ्यात खास गोष्ट अशी आहे की यामध्ये तुम्ही फ्री सब्सक्रिप्शन सोबत व्हॅलिडिटी आणि फ्री कॉलिंग ची सुविधा सुद्धा मिळवू शकतात. तुम्ही या रिचार्ज मध्ये डबल फायदा मिळवू शकता. चला तर जाणून घेऊया या प्लान्सच्या बाबतीत –
Jio या प्लॅनमध्ये देत आहे फ्री Netflix
रिलायन्स जिओचा लिस्टमध्ये एकापेक्षा एक प्लॅन्स शामिल आहेत. जिओ जवळजवळ सगळ्या प्लॅन्समध्ये ग्राहकांना चांगले बेनिफिट्स देत आहे. जिओ जवळ असा एक प्लॅन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही फ्रीमध्ये नेटफ्लिक्स बघू शकता. 1499 च्या प्लॅनमध्ये ग्राहकांना चांगली ऑफर मिळू शकते. या प्रीपेड प्लॅन मध्ये कंपनी ग्राहकांना फ्री नेटफ्लिक्सची ऑफर देते. मात्र या प्लॅनमध्ये हे नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन फक्त बेसिक मोबाईलसाठीच मिळू शकते.
जर तुम्ही 1499 रुपयांचं जिओ रिचार्ज करत असाल तर यामध्ये तुम्हाला 84 दिवसाची व्हॅलिडीटी मिळेल. म्हणजे तुम्ही 84 दिवसापर्यंत कोणत्या पण नेटवर्कमध्ये फ्री कॉल करू शकता. या प्लॅनमध्ये साधारण 252GB डेटा तुम्हाला मिळेल. म्हणजे प्रत्येक दिवशी तुम्ही 3 GB डेटा वापरु करू शकता. तुम्हाला प्रत्येक दिवशी 100SMS फ्रीमध्ये मिळू शकतात. कंपनी यामध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, आणि जिओ क्लाऊड याचे सब्सक्रिप्शनसुद्धा फ्री मध्ये देते.
जिओचे 1099 रुपयांचा प्लॅन
1499 रुपयांच्या प्लॅन सारखे जिओकडे फ्री नेटफ्लिक्ससाठी अजून एक स्वस्त प्लॅन उपलब्ध आहे. हा प्लॅन 1,999 रूपयांचा असेल. या प्लॅनमध्ये सुद्धा युजर्स फ्री नेटफ्लिक्सची मज्जा घेऊ शकतात. यामध्ये सुद्धा युजर्सना ते सगळे फायदे मिळतील जे 1499 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळतात. मात्र यामध्ये युजर्सना डेटा कमी मिळतो. यामध्ये तुम्हाला 84 दिवसांची व्हॅलिडीटी आणि 164 GB डेटा मिळेल. म्हणजे प्रत्येक दिवशी तुम्ही 2 GB डेटा वापरू शकता.यासोबतच कंपनी ग्राहकांना जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाऊड यांचा फ्री सबस्क्रीप्शन देते.
इतर महत्वाची बातमी-
Whatsapp Feature Update For iphone :आता आयफोन युजर्सना येणार मज्जा! व्हॉट्सॲप घेऊन आलंय कमाल स्टिकर्स फिचर, 3 स्टेप्स वापरा अन् मित्रांसोबत मजेशीर चॅटिंग करा!
[ad_2]