[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई : व्हॉट्सअॅपमध्ये (Whatsapp) नेहमीच काही नवे फीचर आणले जातात. मेटा नेहमी त्याच्या जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्मसाठी काही अपडेट्स सादर करत असते, जेणेकरून युजर्स नेहमी त्याच्या अॅपकडे आकर्षित राहतील. पण बहुतेकदा युजर्सना व्हॉट्सअॅपवरील आगामी फिचर्सविषीय माहिती मिळत नाही आणि त्यामुळे युजर्स अनेकदा व्हॉट्सअॅपचे नवे अपडेट्स मिळत नाही. पण आता व्हॉट्सअॅपचे नवे फिचर मिळवण्यासाठी ऑटो अपडेटचे फिचर आले आहे.
आतापर्यंत, व्हॉट्सअॅपचे नवीनतम अपडेट जाणून घेण्यासाठी, वापरकर्त्यांना Google Play Store वर जाऊन व्हॉट्सअॅपचे अपडेट्स पाहावे लागत , परंतु आता असे होणार नाही. आता यूजर्सना व्हॉट्सअॅपच्या सेटिंग्जमध्येच अपडेटचा पर्याय मिळेल. WABetainfo ने दिलेल्या माहितीनुसार, WhatsApp वर येणाऱ्या नव्या फिचर्सविषयी माहिती दिली आहे. WhatsApp ने Google Play Beta Program द्वारे Android वापरकर्त्यांसाठी नवीन बीटा आवृत्ती 2.24.2.13 आणली आहे. या नवीन बीटा व्हर्जन अपडेटसह, WhatsApp आपल्या अॅपमध्ये ऑटो-अॅप अपडेट फीचर लाँच करण्यात आले आहे.
व्हॉट्सअॅपमध्ये आलं नवं फिचर
या रिपोर्टनुसार व्हॉट्सअॅपच्या नवीन फिचरचे नाव अॅप अपडेट्स असं आहे. हे फिचर सध्या रोलिंग आऊट स्टेटसमध्येच आहे. या फीचरद्वारे यूजर्सना अॅपच्या लेटेस्ट अपडेटची सूचना आणि व्हॉट्सअॅपच्या सेटिंग्जमध्येच ऑटो अपडेटचा पर्याय मिळेल. यामुळे व्हॉट्सअॅपचे नवीन अपडेट शोधण्यासाठी यूजर्सना गुगल प्ले स्टोअरवर जाण्याची गरज भासणार नाही.
hatsApp ने सध्या हे अपडेट फक्त निवडक बीटा युजर्ससाठी आणले आहे. बीटा युजर्स बीटा व्हॉट्सअॅपच्या या कंपनीच्या नवीन फिचर्सची चाचणी करतात आणि त्यामध्ये काही कमतरता असल्याच त्याविषयी कंपनीला फीडबॅक देतात. उणीवा दूर केल्यानंतर, कंपनी हळूहळू सामान्य वापरकर्त्यांसाठी देखील हे फिचर सुरु करते.
WhatsApp आपोआप अपडेट होणार
येत्या काही आठवड्यांत जगभरातील इतर व्हॉट्सअॅप यूजर्सनाही या अपडेटचा फायदा मिळणे सुरू होईल. WABetainfo च्या रिपोर्टमध्ये व्हॉट्सअॅपच्या या अपडेटचा लेटेस्ट स्क्रीनशॉटही अटॅच करण्यात आला आहे, ज्यामध्ये व्हॉट्सअॅपच्या सेटिंग्जमध्ये अॅप अपडेट सेटिंग्जचा नवीन पर्याय दिसत असल्याचे दिसून येते.
त्याचे टॉगल चालू केल्यानंतर, व्हॉट्सअॅपचे प्रत्येक नवीनतम अपडेट वायफाय कनेक्शनवर व्हॉट्सअॅप ऑटो अपडेट होईल. या सेटिंग्जमधील दुसरा पर्याय सूचनांचा आहे. हे टॉगल चालू केल्यानंतर, व्हॉट्सअॅपमध्ये नवीनतम अपडेट येताच यूजर्सना नोटिफिकेशन्स मिळतील आणि व्हॉट्सअॅपमध्ये कोणतेही नवीन फीचर आले आहे हे त्यांना कळेल.
हेही वाचा :
Call Forwarding Scam : चुकूनही *401# डायल करू नका; आयुष्यभराची कमाई पाण्यात गेलीच म्हणून समजा!
[ad_2]