[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
लंडनः आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशप २०२३च्या फायनल मॅचला द ओव्हलमध्ये सुरुवात झाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या लढतीत पहिल्या दिवशी टीम इंडियाने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने ३ बाद ३२७ धावा केल्या होत्या. यात ट्रेव्हिस हेडचे धमाकेदार शतक आणि स्टिव्ह स्मिथच्या ९५ धावांचा समावेश आहे. आता दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया किती धावांची भर घालते, तसेच टीम इंडिया कमबॅक करते का याची उत्सुकता आहे. या सामन्याचे लाइव्ह अपडेट जाणून घ्या…भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया WTC Final LIVE अपडेट
> ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये
शमीच्यानंतर सिराजने दिला ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, कॅमरून ग्रीनची घेतली विकेट, ग्रीन ६ धावांवर बाद झाला
> ऑस्ट्रेलियाची चौथी विकेट
धोकादायक ट्रेव्हिस हेड बाद झाला, मोहम्मद सिराजने १६३ धावांवर बाद केले- ऑस्ट्रेलिया ४ बाद ३६१
> हेडच्या १५० धावा, कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्यांदा दीडशेहून अधिक धावा केल्या
> स्टिव्ह स्मिथचे २२९ चेंडूत शतक
दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या चेंडूवर चौकार मारून शतक पूर्ण केले
> दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात
> IND vs AUS मॅच हातातून घालवायची नसेल तर भारतीय संघाला आज या ४ गोष्टी कराव्याच लागतील
> रोहित शर्मा तुझा निर्णय चुकला? ट्रेविस हेडकडून भारतीय गोलंदाजांची बेदम धुलाई
> हेड शतक करतो तेव्हा ऑस्ट्रेलिया जिंकतोच, असे आहे रेकॉर्ड
[ad_2]